आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार भरगोस वाढ, केंद्राचा नवीन अहवाल
यंदा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेतीमालाला आधारभूत किंमत मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे नैसर्गिक तसेच आर्थिक असे दोन्ही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या सर्व अडचणी लक्षात घेता सरकारने सुरु केलेल्या हमीभाव केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. या माध्यमातून धान खरेदी देखील जास्त प्रमाणात झाली आहे. यामध्ये तांदूळ, ज्वारी, गहू यांसारख्या पिकांचा समावेश आहे.
मागील ६ वर्षात किमान आधारभूत किमतीवर धान खरेदीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ८० टक्यांने वाढ झाली आहे. तर गव्हाच्या संख्येत १४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पनीय भाषणात सांगितली आहे.
ही वाचा (Read This ) या गाईचे पालन करून मिळवा लाखों रुपये
धान खरेदीमध्ये झालेला बदल
२०२१-२२ च्या रब्बी तसेच खरीप हंगामात गहू आणि धानाची खरेदी १२ कोटी ११ लाख टन एवढी अपेक्षित असून तब्बल १ कोटी ६३ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या माध्यमातून शेतीमालाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून तयाच शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे. परंतु फूड कोर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २०१५-१६ च्या तुलनेत २०२१ मध्ये शेतकऱ्यांच्या संख्येत ८० टक्क्याने वाढ झाली असून गहू खरेदीमध्ये १४० टक्यांनी वाढ झाली आहे.
हे ही वाचा ( Read This) राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, शेकडो कोंबड्यां मृत्युमुखी
इतर राज्यांमधील लाभ
आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि अगदी पश्चिम बंगाल या प्रमुख धान उत्पादक राज्यांमध्ये सरकारी खरेदीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी भारताचा धान्याचे मुख्य आगार असलेल्या पंजाबमध्ये १२.३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
हरियाणा व पंजाब सारख्या राज्यांना खरेदीचा जास्त फायदा होतो. २०१९-२० च्या रब्बी हंगामातील आकडेवारीनुसार सुमारे ७३ % उत्पादन पंजाबमध्ये तर ८० % उत्पादन हरियाणामध्ये खरेदी करण्यात आला आहे.
हे ही वाचा ( Read This) माती चे शोषण नाही पोषण करा….