या गाईचे पालन करून मिळवा लाखों रुपये

Shares

शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालनामध्ये मुख्यतः गायीचे पालन केले जाते. भारतामध्ये गायीच्या गीर जातीचे पालन अगदी पूर्वीपासून केली जात असून गीर गायीला गाईची शुद्ध जात म्हणून ओळखले जाते. तर गीर गाई ही सर्वोकृष्ट दुग्धजन्य जात आहे. आपण आज अश्या सर्वात जुन्या तसेच शुद्ध गाईच्या जातीची माहिती जाणून घेणार आहोत.

ही वाचा (Read This ) ‘ई-श्रम’ वर अशी करा नोंदणी, मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन

गीर गाईचे वैशिष्ट्ये

१. गीर गाईची शेपटी लांब असून त्यांचे पाय काळे खूर आणि कठीण असतात. त्या चालतांना अतिशय हळू चालतात.
२. गीर गाईंचे शरीर विस्तीर्ण असते त्यामुळे उष्णता नष्ट करणे सोपे जात असून ती सर्व प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेते.
३. गीर गाईच्या त्वचेतून सेबम नावाचा द्रव स्त्राव होत असून हा द्रव कीटकांना दूर ठेवतो.
४. गीर गाईचा चेहरा थोडा फुगलेला असून कपाळ लांब आणि रुंद असतो.
५. य गाईचे शिंगे पायथ्याशी जाड असून वरच्या दिशेने वाकलेले असते.
६. गीर गाईचे आयुष्य १२ ते १५ वर्षापर्यंत असून ही गाय ६ ते १० वासरे देऊ शकते.

राज्याही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर

गीर गाईचे फायदे आणि तिच्यापासून मिळणारे उत्पन्न

१. भारतातली सर्वात मोठ्या दुग्धजन्य जातींपैकी एक म्हणजे गीर गाई. त्यामुळे तिला जास्त किंमत आहे.
२. गीर गाई सर्व पर्यावरणीय परिस्थितीशी सहज जुळवून घेते.
३. गीर गाईचा प्रजजन दर उच्च आहे.
४. प्रति दिवस प्रमाणे गीर गाई १० लिटर दूध देते.
५. जर तुम्ही ४ गीर गाईचे पालन केल्यास तुम्हाला मासिक उत्पन्न ३२ हजार ते ३५ हजार आणि वार्षिक उत्पन्न ३ लाख ८८ हजार ८०० एवढे मिळते.
जर तुम्ही गाईपालन करत असाल तर गीर गाईचे पालन करणे नक्की फायद्याचे ठरेल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *