रोग आणि नियोजन

मुग पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन

Shares

मुगास आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. मुगामध्ये 24 ते 25 टक्के प्रथिने असून त्याची प्रतही श्रेष्ठ आहे जे गव्हाच्या दुप्पट व तांदळाच्या तिप्पट आहे. प्रथिना शिवाय मुगामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने आहारात मूग अथवा डाळ अंतर्भूत केल्यास संतूलीत आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होऊ शकतो व पचण्यास हलका असल्याने त्यातील प्रथिने अधिक सुलभतेने शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी वापरली जाते. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे 5 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्याने जमिनीची सुपिकता टिकून, ती सुधारण्यास सुद्धा मदत होते. या पिकांच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकांची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय या पिकानंतर घेण्यात येणा-या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.

मुगाला बाजार भाव अधिक असल्यामुळे अत्यंत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. 60 ते 65 दिवसात हेक्टरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे, परंतु या पिकावर साँसपोरा पानावरील चट्टे, भुरी रोग, पिवळा केवढा आणि लिफ किंकल विषाणूजन्य रोग अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. रोग व त्यांचे व्यवस्थापन खालील प्रमाणे आहेत. सकांसपोरा पानावरील ठिपके: हा रोग साँसपोराया बुरशीमुळे होतो. लहान, गोलाकार, मध्यभागी तपकिरी, कडा लालसर,चट्टे पानांवर आढळतात. कालांतराने चट्टयांचा आकार मोठा होतो व त्यामुळे अनेक ठिपके एकमेकांत मिसळल्यामुळे खूप मोठे चट्टे पानावर तयार होते आणि पाने करपल्यासारखे दिसतात. अनुकूल वातावरणात पीक फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात पानगळ होते. रोगाची तीव्रता जास्त असल्यास तपकिरी चट्टे पानाच्या देठावर खांद्यावर व शेंगावर सुद्धा आढळतात. दमट वातावरण व झाडांची संख्या जास्त असल्यास या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. या रोगाचा प्रसार रोगट बियाणे व हवेद्वारे होतो.

उपाय: शेतं तणविरहीत ठेवावे, 30 X 10 सेंटीमीटर या अंतरावर बियाणे पेरावी. या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता मेटीराम 55% टक्के अधिक पायऱ्याक्लॉस्ट्रॉबिन 5 टक्के डब्ल्यू जी या संयुक्त बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुरी: हा रोग इरीसिपी पोलीगोणी या बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण रोपावस्थेत होते. पानावर सुरुवातीला लहान, अनियमित, पांढरे चट्टे दिसतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास बुरशी संपूर्ण पानावर, फांदयावर व फुलावर पसरते. पाने, फुले गळून पडतात, पानाच्या दांड्या, शेंगा आणि खोडावर सुद्धा पांढरे चट्टे आढळतात, उत्पन्नात खुप घट येते. उपाय: हा रोग दिसताक्षणी पाण्यात मिसळणारे गंधक 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

केवडा: हा रोग घातुक लसीमुळे होतो. पानावर अनियमित हिरव्या व पिवळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. नवीन येणारे पाने पूर्णपणे पिवळे झालेले आढळते. साधारणतः प्रादुर्भावग्रस्त झाडांना खूप कमी फुले व शेंगा लागतात. त्या शेंगा आकाराने लहान, वाकड्या व पिवळ्या रंगाच्या असतात. उन्हाळ्यामध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. ह्या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी मुळे होतो.

उपाय: बन तुळशी, क्रोटन आणि शृंगराज पूरक तणांचा नायनाट करावा. सुरुवातीला प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी. शेतामध्ये पांढ-या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५x ३० सेमी आकाराचे हेक्टरी १६० पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर पेरणीनंतर १५ दिवसांनी लावावे.

लिफ किंकल विषाणूजन्य रोग:

लक्षणे : मुग / उडीद पिक पेरल्यानंतर साधारणत: तिन आठवडयानंतर या रोगाची लक्षणे दिसायला सुरवात होते. सर्वप्रथम पानातील हरीत द्रव्य कमी होते, त्यामूळे पाने फिकट पिवळसर दिसतात.रोगग्रस्त झाडांच्या पानांवर खोलगट व उभारलेले भाग दिसतात. तसेच पानांच्या कडा खालच्या बाजूला वळतात. झाडांची वाढ खुंटते . झाडे शेंडयाकडून खाली वाळत येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेंगा येत नाही व आल्यास त्या संख्येने खूप कमी व आकाराने लहान, वेडया वाकडया असतात.

व्यवस्थापन:

१. उन्हाळयात जमिनीची खोल नांगरणी व काडीकचरा गोळा करुन जाळून नष्ट करावा. त्यामूळे शेतात असलेल्या रोगकारक जिवाणू /विषाणू व किटकाचा नाश होईल.

२. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर(३०x १० किंवा ४५४१०) से.मी. ठेवावे.

३. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यामूळे होत असल्यामूळे विषाणू विरहीत बियाण्याचा वापर पेरणी करिता करावा.

४. शेत तण विरहीत ठेवावे. इश्वरी ,खोटी ,चवळी आणि कुंजर या तणावर सदर विषाणू जिवंत राहतो,तो नंतर रसशोषन करणा-या किडी मावा,पांढरी माशी आणि फुलकिडयादवारे मुग /उडीद पिकावर येतो.

५. मुग पिकाबरोबर आंतरपिक म्हणून ज्वारी बाजरी आणि मका ही पिके घेतल्यास किटकादवारे रोगाचा प्रसार कमी होतो, ही पिके अडथळा पिके म्हणून काम करतात.

६. पिकास जास्त नत्रयूक्त खत देणे टाळावे,त्यामूळे पिकांची कायीक वाढ होते व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

७. जमिनीत नेहमी एकच पिक न घेता पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.

८. सदर रोग बियाण्यादवारे होत असल्यामूळे बियाण्यास गरम पाण्याची बिजप्रक्रिया ५२से.तापमानावर २० ते३० मिनीटे पेरणीपूर्वी करावी.

९. रस शोषणा-या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमीडाक्लोप्रिड ७०टक्के डब्लू जी या किटकनाशकाची ५ ग्राम किलो या प्रमाणे बिजप्रक्रिया करावी.

१०. पांढ-या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५x ३० से.मी. आकाराचे हेक्टरी १६० पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर पेरणीनंतर १५ दिवसांनी लावावे.

११. मावा पांढरीमाशी व फुलकिडे यांचा प्रादूर्भाव दिसताच फिप्रोनिल ५ टक्के एस. सी. २० मिली किंवा इमीडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस.एल. २.५ मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्लू जी ४ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गरज वाटल्यास १२ ते १५ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशके आलटून पालटून वापरावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *