दुधाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना याचा कवडीचाही फायदा नाही
दूध ( Milk) उत्पादनावर होणाऱ्या खर्चामुळे आता दूधाचे दर (Milk Rate) वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता तेलंगणामध्ये दुधाच्या दरात वाढ झालेली आहे. दूध उत्पादन उत्पादन खर्च कमी होऊन दूधाचा पुरवठाही कमी झाला आहे की दूध उत्पादनावर होणाऱ्या खर्चामुळे आता दूधाचे दर वाढले आहेत याचा मागोवा घेणे गरजेचे ठरत आहे. पशूखाद्याचे तसेच चाऱ्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने उत्पादनात घट होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा (Read This) या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वात जास्त लाभ, शेवटची तारीख १५ फेब्रुवारी.
दुधाच्या दरात वाढ होण्यामागील कारणे …
दुभत्या जनावराकरिता कापसापासून (Cotton) बनवली जाणाऱ्या सरकीचा जास्त प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे दूधात वाढ होते असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. परंतु या पशूखाद्यामध्ये मागील वर्षभरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्सवर ५ जानेवारीच्या वायदा दरात कापसाच्या सरकीची किंमत ३३०० रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आली असून मागील वर्षी ५ जानेवारी रोजी ती २१०० रुपयांच्या आसपास होती. याबरोबर सोयापेंड, मोहरी आणि भुईमूग यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. गुजरातच्या दूध उत्पादनात ९% वाढ झाली असून देशभरातील दूधाच्या उत्पादनात वाढ ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक दूधाचे उत्पादन होते. तर दुसरीकडे दूध उत्पादनाच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, असे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी म्हणतात.
दूध पूरवठा तसेच मागणीवर परिणाम…
कोरोना संकट उध्दभवल्यापासून दुधाच्या पुरवठ्यात सतत अडचणी निर्माण होत आहे. दूध उत्पादन कधी कमी तर कधी जास्त होत असून दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्याच बरोबर त्याचा पुरवठा देखील नियामक होत असल्यामुळे दुधाच्या दरवाढीशिवाय आता काही पर्याय नसल्याचे डेअरी कन्सल्टंट डॉ. आर.एस. खन्ना यांनी सांगितले आहे. उत्पादन खर्च वाढला त्यामुळे दूधाच्या दरात वाढ होईल असे म्हणने थोडे चुकीचे आहे. दुधाचा पुरवठा कसा होणार यावर दुधाचे दर अवलंबून आहे, असे सोधी यांनी सांगितले आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, वाढत खर्च, वाढते उत्पादन तसेच पुरवठा या सर्वांवर दुधाचे दर अवलंबून आहे.