मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन…
व्यवस्थापनः –
स्वच्छता मोहीम राबवावी व शिफारशीत खताची मात्रा दणे, नत्र खतावा अतिरीक्त वापर करू नये.
लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करून लवकर परेणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा.
मका बियाण्यास सायंट्रेनिलीप्रोल १९.८+थायोमेथोक्झाम १९.८ टक्के एफएस ६ मिली प्रति किलो या प्रमाणे बिजप्रक्रिया करावी.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी २० या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (३० दिवसापर्यंत)
मका + उडीद/मुग/तूर आंतर पिक घ्यावे
मका पिका सभोवताल सापळा पिक म्हणून हायब्रीड नेपीयर च्या ३ ते ४ ओळी पेराव्या व त्यावखादूर्भाव दिसताच शिफारशीत किटकनाशकाची फवारणी करावी.
पतंगाची संख्या ३पतंग/कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवडयाने एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर ३ ते ४ दिवसापर्यत रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये.
प्रादुर्भावाची लक्षणे
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळयांचा समुह असलेली प्रादूर्भाव ग्रस्तपाने
(पाढरे चट्टे असलेली) अंडी/अळ्यांसहीत नष्ट करावी.
प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावास्त पोंग्यामधे सुकलेली वाळू टाकावी
पतंग मोठया प्रमाणवर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या
घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.
उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी या अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सुवातीस पानातील हरीत लवक खावून पानावर पांढरे, लांबट पढे/रेषा किंवा ठिपके दिसतात त्याच वेळी जैविक किटकनाशकांची फवारणी करावी.
बॅसीलस थूरीजीअसीस व कुर्सटाकी २० गॅम/१० ली पाणी किंवा ४०० ग्रॅम/एकर या प्रमाणे फवारणी करावी. अंडयाची उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सुक्ष्म अळयांचा नियंत्रणासाठी ५ टक्के प्रादुर्भाव असल्यास,५ टक्के निबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम, ५० मिली प्रति १० लिटरया प्रमाणे फवारणे
प्रादुर्भाववास्त पोगा
रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्था (उगवणीनंतर ३ ते ४ आठवडयानी) : ५ टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था (उगवणी नंतर ५ ते ७ आठवडयानी): मध्यम पोगे अवस्थेमधे १० टक्के पोंगयामथे प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमधे २० टक्के पोंग्यामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था(ऊगवणीनंतर ८ आठवडयानी): फवारणीची गरज नाही परंतू १० टक्के कणसामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी.
ज्या शेतकरी बंधुंनी बिजप्रक्रिया केलेली नाही त्यांनी या किडीचा व्यवस्थापनाकरीता उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी फवारणीसाठी क्लोरॅन्टूनिलीप्रोल ९.३ टक्के प्रवाही + ल्यव्डा सायहेलोनिन ४.६ टक्के झेडसी प्रवाही ५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७ टक्के एससी प्रवाही,५.१२ मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही एससी, ४.३२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५टक्के एसजी, ८ॉम किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के + ल्युफेनुरॉन ४० टक्के डब्ल्युजी, १.६ ग्रॅम किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के डब्ल्युपी, २० गॅम किंवा नोव्हाल्युरॉन ५.२५ टक्के + इमामेक्टीन बेन्झोएट ०.९ टक्के प्रवाही एससी, ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये त्याऐवजी जैविक किटकनाशकाच वापर करावा.