इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022- यासाठी असा करा अर्ज

Shares

शेतकऱ्यांसाठी खास सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी सोलर पंप उपलब्ध करून देणार आहे आणि जुने डिझेल तसेच वीज पंप बदलून देणार आहे. नवीन पंप साठी अनुदान दिले जाणार आहे. सध्या अनेक शेतकरी शेती कारण्यासाठी डिजिटल आणि विजेच्या पंपाचा उपयोग करतात.ज्यासाठी जास्त प्रमाणात खर्च होत असून डिजिटल पंप खूप महागडे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोयीचे जावे यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे.

ही वाचा (Read This ) या फळबागाचे योग्य नियोजन करून मिळवा वर्षभर उत्पन्न

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत काय लाभ मिळेल?

१. जुन्या डिजिटल पंप ला नवीन सोलार पंपने बदलले जाईल.
२. सिंचन करण्यासाठी सरकारकडून विजेसाठी अनुदान दिले जाईल.
३. ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे कनेक्शन आहे त्यांना एजी सौर ऊर्जा पंप देण्यात येईल.
४. शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी सोलर पंप उपलब्ध करून दिला जाईल.
५. पहिल्या टप्प्यात सरकार 25,000 सोलर वॉटर पंप आणि दुसऱ्या टप्प्यात 50,000 सोलर पंप वितरीत करणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात सरकार शेतकऱ्यांना २५ हजार सौरपंपांचे वाटप करणार आहे.
६. ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकर्‍यांना ३ HP पंप आणि मोठ्या शेतीसाठी ५ HP पंप मिळतील.

हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये

पात्रता

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत असणे गरजेचे आहे.
२. दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
३. वनविभागाच्या एनओसीमुळे ज्या गावांमध्ये अद्याप विद्युतीकरण झालेले नाही असे शेतकरी देखील या योजेसाठी पात्र ठरतील.
४. निवडलेल्या लाभार्थ्यांच्या शेतात 5 एकरपर्यंत 3 HP DC आणि 5 एकरपेक्षा जास्त 5 HP DC पाईपिंग यंत्रणा बसवण्यात येईल.
५. ज्या शेतकऱ्यांकडे जलस्रोत म्हणजे नद्या, नाले, स्वत:चे आणि सामान्य शेत तलाव आणि खोदलेल्या विहिरी इ. उपलब्ध आहे.

ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. ओळख पत्र
३. रहिवासी प्रमाणपत्र
४. शेती विषयक कागदपत्रे
५. बँकेचे खाते पासबुक
६. मोबाईल क्रमांक
७. पासपोर्ट साईज फोटो

ही वाचा (Read This ) PM-SYM : शेतकऱ्यांसाठीची काय आहे पेन्शन योजना, कसा करावा अर्ज?

अर्ज कसा करावा ?

१. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
२. त्यानंतर तुम्हाला बेनेफिसिअरचे सर्विस (Beneficiary Services) हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून नंतर न्यू कॉंसुमर (New Consumer) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
३.. तुमच्या समोर अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरून अपलोड (Upload) वर क्लिक करावे.
४. सर्व माहिती नीट भरल्यानंतर सेवटीं सबमिट (Submit) बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज पूर्ण होईल.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

अधिकृत संकेतस्थळ

https://www.mahadiscom.in/solar/index.html

मराठीमधून अर्ज कारण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.mahadiscom.in/solar/index_mr.html

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *