लिंबू खाण्याचे तोटे ….
लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना लिंबू मीठ लावून खाण्याची सवय असते. ती शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे कारण लिंबू आणि मिठाच्या एकत्रित सेवनाने तुमच्या दाताला हानी पोचण्याचा संभव असतो.
1) अपचन किंवा अजीर्ण झाले असल्यास लिंबू यावर खूप उपयुक्त आहे. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि सातत्याने चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी आदी त्रास कमी होतो.
2) पोट दुखत असेल तर आले आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. त्यामुळे पोटदुखी थांबते.
3) उलटीचा त्रास होत असेल तर लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास उलटी थांबते. अजीर्ण होत असेल तर लिंबू फार उपयुक्त आहे.
4) पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते आणि शौचास साफ होते.
5) लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यातून घेतल्याने खूप फायदा होतो.
6) वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच उलटी थांबण्यास मदत होते.
7) अंगाला खाज सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून चोळावा.
लिंबाचे दुष्परिणाम…!
दातांचे इनॅमल नष्ट होते
संशोधनातून समोर आले आहे की, लिंबू संत्री यांच्या ज्यूसमध्ये अधिक सॅट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे दातांचे इनॅमल कमकुवत होते. दातांवर डाग पडू शकता. लिंबूच्या या दुष्परिणामापासून दूर राहण्यासाठी लिंबू पाण्यात किंवा अन्य पदार्थ मिसळून खावे.
छातित जळजळ
जर तुम्ही उपाशीपोटी लिंबाचा ज्यूस प्यायला तर छातित जळजळ किंवा अन्य समस्या होऊ शकते. कारण हे अॅसिडिक असते. तसे तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिणे फायदेशीर असते. परंतु लिंबूचा रस प्रमाणातच टाका. यामध्ये मध अवश्य टाका.
डीहायड्रेशन आणि वारंवार यूरीनेशन
लिंबूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते ज्यामुळे लिंबू मुत्रवर्धक बनते. यामुळेच जर तुम्ही अधिक प्रमाणात लिंबू खाल्ले तर किडनीमध्ये यूरिनची निर्मिती वाढते ज्यामुळे डीहायड्रेशनची समस्या होऊ शकते. लिंबूमध्ये 138 मिलीग्राम पोटॅशियम असते. जे खुप जास्त असते. यामुळे लिंबूचा रस जास्त सेवन केल्याने ते पचन होण्यास अवघड होते.
पोट दुखी
अधिक प्रमाणात लिंबूचे सेवन केल्याने याच्या अॅसिडिक प्रभावामुळे पोटदुखी होऊ शकते. कारण पोट अधिक एस्कोर्बिक अॅसिड सांभाळू शकत नाही. असे खुप कमी वेळा होते.