कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवून देणारी पालेभाजी
कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर पालक , मेथी ,शेपू , कोथिंबीर यांची लागवड करावीत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने यांची लागवड करावी. पालेभाज्यांची वाढ लवकर होऊन पीक लवकर तयार होते. आपण जाणून घेवूयात कशी करावी लागवड याबद्दल संपूर्ण माहिती.
१. पालेभाजी लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करून चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावेत.
२. यांची लागवड मध्यम, कसदार जमिनीत करता येते.
३. पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय खतांने भरपूर असणारी जमीन निवडावी.
४. दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने हप्त्याहप्त्याने पेरणी केल्यास भाजीचा सतत पुरवठा होतो.
५. पिकास पेरणी नंतर हलके पाणी द्यावे.
६. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने खुडावित किंवा कपावित.
७. मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची काढणी पाने कोवळी असतानाच करावीत. जेणेकरून बाजारात जास्त भाव येईल.
पालेभाज्या लवकर विक्रीस तयार होतात. त्यांची काढणी एका लागोपाठ करता येते. पालेभाज्यास भाव देखील चांगला मिळतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात यांची वाढ चांगली होते. पालेभाज्यांचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेता येते. पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्व , खनिजे असतात त्यामुळे त्यांचा औषधी तयार करण्यासाठी देखील उपयोग होतो.