कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी पपई लागवड !

Shares

पपई हे जलवर्गीय फळ कित्येकांचे आवडते फळ आहे. कित्येक विकारांवर गुणकारी असणाऱ्या ह्या फळातून “अ” जीवनसत्वासोबतच अनेक जीवनसत्वे मिळतात. पपईच्या गरामध्ये थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व “क” ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम एवढे आढळते.

पपईपासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, बेबी फूड्स असे पदार्थ तर बनतातच शिवाय पपई बद्धकोष्टता, पोटाचे विकार, अपचन, मुळव्याध, अशा आरोग्य समस्यांवर देखील गुणकारी आहे.

हवामान
मुबलक पाणी आणि उष्ण व कोरडे हवामान असणाऱ्या ठिकाणी ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. थंड हवामानात तयार झालेली पपई बेचव असते.

जमीन
१) पपईची लागवड करण्यासाठी जमीन ही पाण्याचा निचरा होईल अशी असावी.
२) लागवडीची जागा ही मोकळी असावी.
३) जमिनीमध्ये जैविक पदार्थांची चांगली उपलब्धता असावी.
४) जमीन ही कसदार आणि माध्यम काळ्या स्वरूपाची असल्यास पपईची चांगली वाढ पाहायला मिळते.
५) याउलट जर जमीन ही खडकाळ, चुनखडीची, भुरकी आणि खोलगट अशा स्वरूपाची असेल तर पपईची वाढ चांगली होत नाही.

जमीन खोलगट स्वरूपाची असेल किंवा पाण्याचा निचरा हा योग्यप्रकारे झाला नाही, तर खोडाला रोग पडतो आणि खोड बुंध्याजवळ कुजणे चालू होते.

अशी करावी पपई लागवड :
१) पपई लागवड करताना आधी बियांपासून रोपे तयार केली जातात. सुमारे 1 हेक्टर क्षेत्रासाठी लागवड करायची झाल्यास 250-300 ग्रॅम. बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी.
२) पपईची जात द्विलिंगी असल्यास जास्त बियाण्यांची मात्रा देणे आवश्यक असते. जर जात उभयलिंगी असेल तर कमी बियाणे देखील पुरेसे ठरतात.
३) द्विलिंगी जातींच्या झाडामध्ये 50% नर झाडाची आवश्यकता असते अशा वेळी पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावी लागतात. म्हणून अशा ठिकाणी 2-3 रोपांची लागण करणे आवश्यक असते.

१) जमीन सपाट आणि एकरूप करून घ्यावी
२) पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी.
३) कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमिनीची पातळी समान करून घ्यावी.
४) पपई लागवड 2.5 x 2.5 किंवा 2.25 x 2.25 मी अंतरावर करावी.
५) पपई लागवडीसाठी सुमारे दिड-दोन महिन्याची वाढलेली रोपे वापरावीत.

       अशा प्रकारे जमिनीची रचना आणि पिकाची सुयोग्य काळजी घेतल्यास पपईची लागवड कमी खर्चात भरघोस उत्पन्न देऊन जाते.
       यामुळे शेतकऱ्यांचा फायदा हा निश्चितच होतो. व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *