कडू कारल्याचे गुणकारी फायदे
अत्यंत गुणकारी जरी असले तरी कारले म्हंटले की लहान लेकरं काय मोठी माणसे सुद्धा वाकडं तिकडं तोंड करतात . चवीला कडू असल्या कारणाने बहुतेक लोक कारले खाण्यास टाळाटाळ करतात. तरीही गृहिणी वेगळ्या वेगळ्या शक्कल लढवून कारल्याचे कडूपणा दूर करण्याचा प्रयत्न करता जेणे करून लहान मुलानं बरोबर सर्वांनी कारले खावे. कारले चिरून जर त्याला मीठ लाऊन ठेवळे तर त्यातील जीवनसत्व नष्ट होतात. कारल्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. कारल्याचे अजून अनेक फायदे आहेत.
१. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.
२. पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.
३. कारले हे शक्तीवर्धक आहे.
४. कारल्याच्या रसामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.
५. यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.
६. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.
या सर्व फायदेशीर गोष्टींमुळे आहारात कारल्याचा समावेश आवर्जून केलाच पाहिजे.