जयंती मासा म्हणजे पैसाच पैसा
मत्स्य शेती करताना आपण वेगवेगळ्या जातीच्या माशांचा विचार करतो. कमी भांडवलात आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न असणाऱ्या काही मोजक्या माशांच्या जातींमध्ये ‘जयंती’ या जातीचे नाव घेतले जाते. जयंती रोहो मासे हे रोहा प्रजातीतील एक उत्कृष्ट जात मानली जाते. या जातीचे वैशिष्ठ्य म्हणजे हे मासे ९ ते १२ महिने एवढ्या कमी काळात विक्रीसाठी उपलब्ध होतात. हे जयंती मासे इतर सामान्य रोहा प्रजातीच्या माशांपेक्षा जास्त वेगाने वाढतात. त्यामुळे या माशांच्या पाळण्याच्या खर्चात २० टक्क्यांपर्यंत बचत होते. त्यासोबतच मिळणाऱ्या नफ्यामध्ये सुमारे २३ टक्क्यांपर्यंत वाढ होते. जयंती रोहो माशाचा विकास साधारणपणे ५३ दिवसांमध्ये होतो.
या राज्यांमध्ये होते माशांचे पालन :-
रोहा जातीच्या माशांचे पालन भारतात आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये होते. बाकीच्या राज्यांमध्येसुद्धा आता हळूहळू मत्स्यपालनाचा वेग वाढत आहे.
काय आहेत या माशाची वैशिष्ट्ये ?
छोट्या किंवा मोठ्या अशा कोणत्याही जागेमध्ये या जातींच्या माशांना पाळता येते. या जातीची मागणी सगळीकडेच प्रचंड आहे. यातून मिळणाऱ्या पोषक घटकांचे प्रमाण हे बाकीच्या जातीच्या माशांपेक्षा जास्त आहे. वजनाचा विचार करायचा झाला तर हे मासे फक्त ९ ते १२ महिन्यांमध्ये तब्बल अडीच किलोपर्यंत वाढतात.
खर्च कमी – उत्पन्न ज्यादा
बाकीच्या माशांच्या तुलनेत फक्त यांना मागणी जास्त आहे असे नाही, तर यांना लागणारा खर्च हा बाकीच्या जातींच्या माशांना लागणाऱ्या खर्चापेक्षा एका किलोमागे जवळपास १२ रुपये कमी लागतो, त्यामुळे खर्चात खूप बचत होते. फक्त भारताचा विचार करायचा झाला तर, देशामधील जयंती रोहू माशाचे एका वर्षाचे बाजार मूल्य १३०० कोटी रुपये एवढे आहे.
तर असा आहे कमी भांडवलात, कमी खर्चात आणि कमी काळात मालामाल करून टाकणारा मासा. मासे पाळण्यासाठी माशाच्या जातीची निवड करायची झाल्यास हा मासा घ्यायलाच पाहिजे.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क