जाणून घ्या मिरचीच्या जातींबद्दल माहिती
मिरचीच्या अनेक जाती आहे. मिरचीच्या वापरानुसार त्यांच्या जातीची निवड केली जाते. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल , कमी बिया असलेल्या जातीची निवड करावी लागते. तर हिरव्या मिरचीसाठी आकर्षित रंग , तिखट , लांब अश्या मिरचीच्या जातीची निवड करावी. मिरचीच्या काही जातीबद्दलची माहिती आपण आज जाऊन घेऊयात.
मिरचीच्या जाती –
फुले सई –
१. या जातीचे झाडे मध्यम आकाराची असतात.
२. याची फळे ८ सेमी पर्यंत वाढतात.
३. वाळल्यानंतर यांचा रंग गडद लाल होतो.
४. या जातीच्या मिरच्या मध्यम तिखट असतात.
फुले ज्योती –
१. या जातीच्या फळांची लांबी ६ ते ८ सेमी असते.
२. या जातीच्या मिरचीचा रंग हिरवा असून त्या पिकल्यावर त्यांचा रंग लाल होतो.
३. या जातीच्या वाळलेल्या मिरचीचे २८ ते ३० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होते.
मुसळेवाडी सिलेक्शन –
१. या जातीच्या मिरच्या ६ ते ७ सेमी लांब असतात.
२. या जातीच्या मिरचीचा रंग गडद हिरवा असतो तर वाळल्यानंतर त्यांचा रंग गडद लाल होतो.
३. या जातीच्या वाळलेल्या मिरच्यांचे सरासरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन होते.
अग्निरेखा –
१. या जातीच्या मिरच्या ११ सेमी पर्यंत लांब असतात.
२. या जातीच्या मिरचीचा रंग गडद हिरवा असतो.
३. या जातीच्या मिरची पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते.
४. याचे हेक्टरी सरासरी २५ ते २६ क्विंटल पर्यंत उत्पादन होते.
संकेश्वरी ३२-
१. या जातीच्या मिरचीची लागवड लाल मिरचीसाठी केली जाते.
२. या जातीच्या मिरचीचा रंग तांबडा असतो.
३. या जातीच्या मिरच्या जास्त काळ साठवून नाही ठेवता येत.
४. या मध्यम तिखट असतात.
पंत सी १ –
१. मिरचीची ही जात हिरव्या , लाल दोन्ही साठी चांगली आहे.
२. या मिरचीची लांबी ३ ते ४ सेमी लांब असते.
३. या मिरचीमध्ये तिखटपणा जास्त असतो.
मिरचीच्या अश्या अनेक जाती आहेत. यांची लागवड हवामान , बाजारपेठेतील मागणी यांचा अंदाज घेऊन केली जाते.