या राज्यात लाल मिरचीचा ठसका, भाव २५ हजार पार
यंदा शेतमालाच्या दरात सतत चढ उतार होतांना दिसून येत आहे. मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकाचे महत्व जास्त वाढले असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याचे कारण देखील तसेच आहे, नंदुरबारमध्ये लाल मिरचीला १६ हजार प्रति क्विंटल दर मिळत असून तेलंगणामध्ये मिरचीला २५ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अनुममुला बाजारपेठेचा उल्लेख केलं वाजतो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. मिरचीच्या दराला यंदा तेजी आली आहे. भविष्यात दरात अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. वारंगलच्या बाजारामध्ये लाल मिरचीच्या यूएस ३४१ वाणाला चक्क २५ हजार रुपये दर मिळत आहे. त्याचबरोबर मिरचीची देश-विदेशात निर्यात सुरु झाली आहे.
ही वाचा (Read This ) अश्यापद्धतीने करा हळद लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न
मिरचीच्या वेगवेगळ्या वाणांचा दर
मिरचीचा दर हा त्यांच्या वाणांवर अवलंबून आहे. त्यात तेजा मिरचीला १६ हजार ते १८ हजार ८०० रुपये, वंडर हॉट वाणाच्या मिरचीला १७ हजार ते २२ हजार ५०० रुपये, लाल मिरचीच्या १०४८ वाणाला १६ हजार ते १९ हजार रुपये , लाल मिरचीच्या ३४४ वाणाला १५ हजार ते १८ हजार रुपये दर मिळत आहे. तर टोमॅटोच्या आकारातील मिरचीला २२ ते २५ हजार रुपये पर्यंतचा दर मिळत आहे. मागील वर्षी या वाणाची किंमत १३ ते १६ हजारांमध्ये होती.
पुढे दर असेच चढे राहणार का?
सध्या तेलंगणामध्ये लाल मिरचीची पूर्ण काढणी झालेली नाही याचा फायदा इतर भागातील शेतकरी घेत आहेत. पुढील अजून कधी दिवस लाल मिरचीचे दर हे असेच अधिक राहतील, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. जेव्हा तेलंगणातील मिरचीच्या तोडणीस सुरुवात होईल तेव्हा दर कोसळण्याची शक्यता आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर जास्त राहतील. याचा मिरची उत्पादकास नक्की फायदा होईल.
ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज