या पिकाची लागवड करा, मिळेल भरगोस उत्पादन आणि नफा

Shares

आयुर्वेदात सर्वात महत्वाची, उच्च स्थान असणारी कोरफड ही सर्वांना माहिती आहे. अनेकांच्या घरी कोरफडीचे रोप असते. कोरफडला आंतराष्ट्रीय बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा वापर वैदयकीय तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस कोरफडीची मागणी वाढत आहे. कोरफडीची शेती करून शेतकरी एकरी १ ते २ लाख रुपयांची आरामात कमाई करू शकतो. शिवाय यासाठी कमी खर्च लागून या पिकाकडे जास्त असे लक्ष द्यावे लागत नाही.

हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये

जमीन व हवामान

१. कोरफडीचे पीक कोणतयाही जमिनीवर घेता येते.
२. क्षारपड जमिनीमध्ये कोरफडीचे पीक अधिक उत्तम येते.
३. कोरफड लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करावे. जेणेकरून एनपीके चा वापर शेतात करता येईल.

ही वाचा (Read This ) अश्यापद्धतीने करा हळद लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

लागवड

१. कोरफडीची लागवड वर्षभरात कधी ही करता येते. मात्र फेब्रुवारी महिना हा पोषक ठरतो.
२. एका एकरामध्ये कोरफडीच्या ३००० ते ५००० रोपांची लागवड करावी.
३. कोरफडीच्या चांगल्या वाढीसाठी ३ ते ४ टन शेणखत, २५ किलो युरिया, ३५ किलो स्फुरद, १० किलो पालाश प्रति एकर द्यावे.
४. कोरफडच्या उत्तम वाढीसाठी त्यांच्या वाढीच्या काळात नायट्रोजनची फवारणी करावी.
५. कोरफडीच्या पिकास अगदी कमी पाण्याची आवश्यकता असते. मात्र हवामानाचा अंदाज घेऊन त्यास पाणी द्यावे.
६. लागवड केल्यानंतर लगेचच पाणी दिल्यास कोरफड चांगली सेट होते.
७. कोरफड पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन उत्तम पर्याय आहे. येणारे वेळ आणि पाणी दोघांचीही बचत होते.

ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज

काढणी

१. कोरफड लागवड केल्यानंतर साधरणतः १० महिन्यांनी याची काढणी करता येते.
२. तुम्हाला अधिक चांगली गुणवत्ता असलेली तसेच जास्त प्रमाणात कोरडफड हवी असल्यास तुम्ही अधिक १ वर्षाने कोरफडची काढणी करू शकता. जेणेकरून कोरफड अधिक २ ते ३ फूट उंच होऊन तिचे वजन अधिक मिळेल.

उत्पन्न

कोरफड पिकाची योग्यपद्धतीने काळजी घेतल्यास प्रति एकर प्रमाणे १५ ते २० टन कोरफड सहज मिळते. आर्थिकदृष्ट्या कोरफडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *