एका एकरात चक्क १५ लाखांचे उत्पन्न !
एका कृषी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थाने एका एकरातून चक्क १५ लाख रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. त्या विद्यार्थ्याने पेरूची शेती करून शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. हा विध्यार्थी कर्जत तालुक्यात राहत असून सद्गुरू कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या स्वतःच्या शेतजमिनीमध्ये एका एकरावर पेरूच्या तैवान जातीची लागवड केली होती. त्याने आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर करून शास्त्रीय पद्धतीने पेरूची शेती केली. त्याने पेरूच्या रोपापासून झाड होऊन फळे येऊ पर्यंत पूर्ण काळजी घेतली आहे. त्याने कमी क्षेत्रात पेरू लागवड करून अधिक उत्पन्न मिळवले आहे.
अनेक अडचणींचा सामना करून केली शेती
यंदा सगळीकडे विविध समस्यांमुळे उत्पादनात घट झालेली दिसून आली आहे. कर्जत तालुक्यात देखील दुष्काळजन्य परिस्थिती मुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नव्हते. अश्या परिस्थितीत या विद्यार्थ्याने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून सर्व अडचणींवर मात करत सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
या विद्यार्थ्यांची शेती पाहण्यासाठी कृषी महाविद्यालयातील त्याच्या शिक्षकांनी त्याच्या पेरू बागायत ला भेट देऊन त्याचे कौतुक केले आणि सर्वांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करावी असे आवाहन देखील दिले.