द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात ?
कोरोना नंतर एकालागोपाठ नैर्सर्गिक तसेच आर्थिक संकट येत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून अजूनही शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत आहेत. त्यात द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता द्राक्ष घडावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतांना दिसत असून शेतकरी चिताग्रस्थ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापासूनच द्राक्ष पिकाची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र यासाठी अधिकच खर्च होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हे ही वाचा (Read This ) या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा लाखोंचे उत्पन्न
वातावरणाचा द्राक्ष पिकांवर झालेला परिणाम
मागील काही महिन्यापूर्वी अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. आता मात्र पडणारे धुके, वातावरणातला गर्व, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांवर पुन्हा नवीन काळ्या बुरशीचे संकट आले आहे. त्यात नेमकी आता कोणती उपाय योजना करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून त्यासाठी आता वेगळा जास्तीचा खर्च लागणार या विचारानेच निराश झाला आहे.
या बुरशीवर काय उपाययोजना करावी ?
कोरोना काळात शेतकऱ्यांना अगदी कवडीमोलात द्राक्षाची विक्री करण्याची वेळ आली होती. यंदा पाऊस चांगला झाला होता त्यामुळे चांगली फळधारणा झाली होती मात्र अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे नुकसान झाले आहे. त्यात वाढती थंडी, धुके, गारवा वाढला असता शेतकऱ्यांनी तापमान ४ ते ६ अंश सेल्सियस दरम्यान टिकून राहावा यासाठी द्राक्ष बागेला ड्रीपद्वारे पाणी देऊन बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. आता द्राक्ष घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या बाजार भावावर परिणाम होणार असल्याने झालेला मोठा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती निर्माण झाल्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभा राहील आहे. पुन्हा द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.