रेशीम शेती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, या विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी समृद्ध होणार
मराठवाड्यामध्ये सुरुवातीला केवळ जालना आणि बीड मध्ये रेशीम शेती केली जात होती. आता मात्र रेशीम शेतीचे महत्व तसेच कृषी विभागाने दिलेले योगदान पाहता मराठवाड्यामध्ये रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले आहेत.
खरेदी केंद्राच्या माध्यमातून जालना आणि बीड ला बाजारपेठ उपलब्ध झाली होती मात्र रेशीम कोषाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यास थेट कर्नाटकला पाठवावे लागत होते. परंतु आता जालन्यातील खरेदी केंद्रावरच रेशीम गुणवत्ता चाचणी सुरु होणार असल्याची माहिती रेशीम विभागाने दिली आहे.
या सुविधेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि रेशीमचा दर्जा कळण्यास मदत होईल असे रेशीम विभागाने सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान
राज्यातील पहिले रेशीम खरेदी उपकेंद्र
जालना जिल्ह्यामध्ये तुती लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एप्रिल २०१८ मध्ये जालना येथे पहिले रेशीम उपकेंद्र सुरु करण्यात आले होते.
त्यामुळे राज्यभरातील १५ हजार ५५० शेतकऱ्यांकडून १ हजार ३५० टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले असून खरेदीसाठी राज्यभरातून तसेच कर्नाटकातून देखील व्यापारी येथे हजेरी लावत होते. आता रेशीम कोष दर्जाची चाचणी होणार असून यास चांगला दर देखील मिळेल.
हे ही वाचा (Read This) प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज
गुणवत्ता चाचणी कशी तपासली जाते ?
रेशीम कोशाची किंमत ही त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे कोशाचे नमुने हे खरेदी केंद्रावर पाठवले जाते. हे कोष परीक्षणासाठी ठेवले जातात आणि त्यातील अळी किती दिवसांनी बाहेर पडते याचे परीक्षण केले जाते.
त्यातून किती उच्च प्रतीचा धागा निघेल याचे परीक्षण केले जाते. ज्याच्या आधारावर शेतकऱ्यांना उत्पादित रेशीमची किंमत ठरवणे सोपे जाते.
हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
जालन्यामध्ये गुणवत्ता चाचणी होणार …
रेशीम शेतीच्या अनुषंगाने जालना बाजारपेठ महत्वाची आहे. रेशीम उत्पादकास ही एक हक्काची बाजारपेठ मिळाली असुन येथे रेशीमला योग्य दर मिळत आहे. येथील रेशीमची वाढती बाजारपेठ पाहता विविध सोई – सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
उच्च गुणवत्ता असलेल्या रेशीम उत्पादनामध्ये जालना जिल्ह्याचा मोठा वाट आहे. त्यामुळे विदर्भ, खान्देश, ठाणे, अहमदनगर येथील रेशीम उत्पादक जालना बाजारपेठस प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जालना येथे गुणवत्ता तपासली जात आहे.