दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दुधाच्या दरात वाढ
कोरोना काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यात एकीकडे दुधाच्या दरात थोडीही वाढ झाली नव्हती तर दुसरीकडे पशु खाद्यांचे दर हे महिन्याकाठी वाढत होते.
मात्र आता २ वर्षांनंतर दुधाच्या दरात वाढ झाली असून शेतकरी आता आनंदात आहेत. मागील २ वर्षांपासून दुधाच्या मागणीत घट झाली होती. आता मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारामध्ये दूध, लोणी आदींची मागणी वाढत आहे.
दुधाचे दर हे २८ रुपये लिटर असे होते तर आता या दरात वाढ होऊन हे दर आता ३१ ते ३२ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता आनंदात असला तरी अजूनही त्यांना पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे काही प्रश्न कायम आहेत.
दुधाच्या दराबरोबर गाईच्या किमतीत देखील वाढ
दुधाच्या दरात २ रुपायांनीं वाढ झाली असून दूध पावडर चे दर १८० रुपयांवरून २७० रुपये किलो तर लोणीपासून तयार होणाऱ्या बटर चे दर २४० वरून ३५० रुपये किलो वर पोचले आहे. यामुळे गाईंच्या दरात देखील वाढ झाली आहे.