गोमुत्राचे शेतीसाठी होणारे अनेक फायदे..
आपल्याला गाईपासून मिळालेली मौल्यवान देणगी म्हणजेच गोमूत्र. गोमूत्र हे पिकांसाठी व मानवासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. अनेक आवश्यक असे मौल्यवान खनिजे आहेत. गोमूत्राने मानवाचे कॅन्सर सारखे रोग बरे होऊ शकतात. गोमुत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्य आहेत. त्यामूळे गोमुत्राचा वापर करून आपण शेतीमध्ये उत्पन्न वाढवू शकतो.गोमूत्रामध्ये द्रावण करताना ९०० मिली पाण्यात १०० मिली गोमूत्र मिसळावं. हे गोमूत्रचं द्रावण वनस्पतींवर आठवडय़ातून एकदा फवारल्यास किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण तर येतंच, पण त्याचबरोबर गोमूत्रतील पोषक द्रव्यांमुळे वनस्पतींची पानं हिरवी आणि तजेलदारही दिसू लागतात आणि वनस्पतींची वाढही चांगली होते. जोरदार फवाऱ्यानं प्रत्येक पानास वरून खालून नीट आंघोळ घातली जाईल अशा रीतीनं गोमूत्रच्या द्रावणाची फवारणी करावी.कडुनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कण्हेर, निलगिरी, तंबाखू, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने, फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्रात टाकावे.
कडुनिंबाचा ५ टक्के पाण्यातील थंड अर्क आणि इतर वनस्पतींचा गरम अर्क (५-१० टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते.
गोमुत्रचे अजून काही फायदे-
१. गोमूत्र हा कुष्ठरोग, ओटीपोटात पोटशूळ दुखणे, गोळा येणे आणि अगदी कर्करोगाच्या उपचारांवर उपयुक्त ठरते.
२. गोमूत्र मानवी शरीरात सर्व विषारी द्रव्ये बाहेर टाकून शुद्ध करते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादींसह मोठ्या प्रमाणात आरोग्याचे धोके कमी होतात.
३. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग होतो.
४. साबण आणि शैम्पूंसारख्या कॉस्मेटिक उत्पादने आहेत जी गोमूत्रा पासून बनविली जातात.
तसेच गोमूत्रावर आधारित व्यापारी कीडनाशकेही सध्या बाजारात मिळतात.