जीवामृत कसे तयार होते आणि त्याचे फायदे

Shares

जीवामृत मध्ये अनेक जीवाणू मिसळले जातात जे पिकांना बुरशी,  कीड पासून दूर ठेवते. जीवामृत चा वापर करून पिकांवरील किडीचे प्रमाण कमी करू शकतो.
जीवामृत चे काही फायदे खालील प्रमाणे –
१. जीवामृतामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
२. शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला याचा उपयोग होतो.
३. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.
४. पिकाची वाढ जोमदार होते.
५  जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते.
६. किड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती उत्पन्न होते.
७. शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो.
८. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते.

जीवामृत तयार करण्याची पद्धत –
साहित्य –
१० लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र , ५ किलोग्रॅम गूळ , गाईचे ५ किलोग्रॅम शेण, २ किलोग्रॅम बेसन पीठ,२ किलो ग्राम वारूळची माती किंवा वडा खालची माती,२०० लिटर पाण्याची टाकी.

कृती –
१. सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे.
२. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही.
३. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा.
४. या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन अॅक्टिव्ह होतात.
५. गूळ मिसळताना, त्याचे खडे राहणार नाहीत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत.
६. नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला, तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्रयुक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे.
७. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.
८. या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे.
९. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे.
१०. नंतर सगळे मिश्रण 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या बॅरलमध्ये पूर्ण पाणी भरावे.
११. नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरलमध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे.
१२. हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. १३. सात दिवसांत जीवामृत वापरले तरी चालते. १४. एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *