रासायनिक खतांचा वापर करणे हानिकारक !
नमस्कार मंडळी,
आपण आपल्या शेती माय साठी दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. आपण स्वत:च्या फायद्यासाठी जमिनींची अन्नसाखळी तोडत आहे. जमिनीमधील सजिव घटक आहे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपण ज्या प्रमाणे श्वास घेत असतो त्याच प्रमाणे जमिन सुद्धा श्वास घेत असते. आपल्याला पाऊस उन्हाची आवश्यक असते व रोग बुरशी यापासून संरक्षण गरजेचे असते तसेच जमिनींचे सुद्धा संरक्षण गरजेचे आहे.आपल्या पूर्वजांनी दिलेली ही संपत्ती पुढील पिढीकडे जशी जिवंत सोपवली आहे तशेच आपली सुद्धा एक जवाबदारी आहे व आपण तिचा सांभाळ करून येणाऱ्या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवणे यामुळे जमिनीचीच्या सुपिकतेचे जतन आणि संवर्धन होऊन मातीचा दर्जा टिकून राहील. जमिनीचा कसदार पणा टिकला तर आपली संपत्ती म्हणजे आपले आरोग्य टिकून राहील या मध्ये कोणतेही दुमत नाही.आपली सर्वात मोठी चुक की रासायनिक खतांच्या अतिवापरा मुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. परीनामी उत्पन्नात घट आणि शेती मधला उत्पादन खर्च वाढत आहे हे मान्य करावे लागेल.
संकरीत बियाण्यांमुळे जे आपले पारंपरिक बियाणे यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या.आपन आपला मानवी हिताचा विचार करून सेंद्रीय व जैविक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे सर्वांच्याच फायद्याचे सुद्धा आहे. शेतीमुळे अनेकांना रोजगार मिळतो.जसे धाण्य विक्री, भाजीपाला विक्री,फळ विक्रेते यांच्या साठी कृषीव्यवस्था टिकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे.एक इंच मातीचा थर निर्माण करण्यासाठी निसर्गाला बरीच वर्ष लागतात. परंतु आपल्या स्वार्थी, हलगर्जी आणि निष्काळजी मुळे हा सुपीक थर नाहीसा होत आहे.
आपला करत असलेल्या या रासायनिक खतांच्या मार्यामुळे जमीनीची सुपीकता घसरली आहे. जमीनीतील खनिजे, आवश्यक घटक नष्ठ होवू लागले आहेत. सुरवातीला जमीनीमध्ये गांडूळांचे प्रमाण जास्त असे. आता रसायना मुळे ते कमी झाले असून शेतकर्यांना कृत्रिमरित्या गांडूळ खत जमीनीत सोडावे लागत आहेत. तसेच परागीकरनासाठी आवश्यक असलेल्या विविध किटक पशु-पक्षी व किटकांच्या जातीही नामशेष होवू लागल्या आहेत. त्याचा परीणाम चिनं ने भोगला आहे.हे सांगायला नवं नाही. आपल्याला जर निसर्गाची साखळी तुटू द्यायची नसेल तर काही तरी वेगळे करावे लागेल. आज ची परिस्थिती अशी झाली आहे कि आज गोदावरी चे पाणी पिण्यासाठी योग्य नाही व आंघोळीसाठी तर नाहीच यांचे कारण पाणी ही प्रदूषित झाले आहेत जमीनीच्या विविध स्तरातून भूगर्भात निचरा होवू लागले आहेत. त्यामुळे पाणी स्त्रोतही प्रदुषित झाले आहेत.रासायनिक घटकांचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. मानवी शरीर विविध आजारांना सहज बळी पडू लागल्याचा निष्कर्ष आरोग्य विभाग कडुन स्पष्ट करण्यात आला आहे.रसायनामुळे मोठा खर्च करुन जमीनीचा पोत व पाण्याचा स्रोत खराब होत आहे.
आपले परम कर्तव्य आहे की कमीत कमी खर्च करुन जास्ती जास्त उत्पन्न व जमीनीचा स्तर टिकविण्यासाठी जैविक शेती उत्तम पर्याय व वातावरण बदलाच्या संकटाशी मुकाबला करता येईल.उद्देश व परीणाम एकच आहे तो म्हणजे विषमुक्त दर्जेदार अन्न उत्पादन. जगभरात वापरल्या नैसर्गिक निविष्टा व त्यांची तयार करण्याची पद्धती यांचा हा संग्रह शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा उद्देश एवढाच की, नैसर्गिक संसाधने वापरून जमीनीचा पोत उत्तरोत्तर सुधारला जाईल व मानव जातीला विषमुक्त अन्न मिळेल. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होईल. नैसर्गिक निविष्टांमुळे पीक निरोगी व उत्पादन भरपूर मिळेल.
मिलिंद जि गोदे