मातीमधल्या कर्बचक्राचे कार्य – एकदा वाचाच
नमस्कार मंडळी आपल्या शेतात वाढणारी पिके वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेतात. मातीच्या द्रावणात असलेला कार्बोनेट व बायकार्बोनेट स्वरुपातील कर्बसुद्धा मुळांद्वारे शोषून घेतात. शोषून घेतलेल्या कर्बाचे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत रुपांतर होऊन वनस्पतींच्या पेशी तयार होतात. या क्रियेत वातावरणात निर्माण होणाऱ्या कर्बाची कमतरता वनस्पती व प्राण्यांच्या कुजणाऱ्या अवशेषांपासून निर्माण झालेल्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे भरून येते.पिकांची मुळे सुद्धा काही प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड वायू जमिनीतील वातावरणात सोडतात. जमिनीतील कार्बन डाय-ऑक्साइड वायूचा समतोल राखण्यासाठी हा वायू वातावरणात सोडला जातो, मग तो पुन्हा पिकांकडून शोषण केला जातो.
खाद्यतेल झाले स्वस्त ! या आठवडयात सलग दोन दिवस खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणत्या तेलाचे भाव किती
जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंच्या क्रियेमुळे जमिनीत कार्बन डाय-ऑक्साइड वायू समतोल राखण्यासाठी हा वायू वातावरणात सोडला जातो. मग तो पुन्हा पिकांकडून शोषण केला जातो. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूच्या क्रियेमुळे त्या जमिनीत कार्बन डाय-ऑक्साइड वायू इतक्या प्रमाणात निर्माण केला जातो की, प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक असलेल्या कार्बन डाय- ऑक्साइड क्रि वायूची गरज भासते. जमिनीत सूक्ष्म जिवाणूंची क्रिया वाढविण्यासाठी शेतजमिनीला सेंद्रिय पदार्थ व सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त पुरवठा होणे आवश्यक आहे.
हळद पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांची मदतीसाठी सरकारकडे याचना
जमिनीवर व जमिनीखाली राहणारी उच्चवर्गीय जनावरे व गांडूळ, वाळवी, कीटक यासारखे उप प्राणी वातावरणातील कार्बन डाय- ऑक्साइड वायूचे शोषण करू शकत नसल्यामुळे कर्बाची गरज भागविण्यासाठी त्यांना, पिकाची उत्पादने म्हणजे चारा, धान्य व पिकांचे अवशेष यावर अवलंबून राहावे लागते. या सेंद्रिय पदार्थाचे चर्वण केल्यावर न पचलेला भाग त्यांच्याकडून विष्ठेच्या व मूत्राच्या स्वरुपात बाहेर टाकला जातो. त्यामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लिग्निन, तेल, मेद इत्यादी कार्बनयुक्त संयुगांचा समावेश असतो. जनावरांची विष्ठा व मूत्र जमिनीवर विखुरली गेली म्हणजे त्यातील सेंद्रिय कर्ब मातीत मिसळला जातो. मात्र त्याचे रुपांतर शेणखत, कंपोस्ट खत व इतर सेंद्रिय कर्ब मातीत मिसळला जातो.
बोका तांदूळ: थंड पाण्यात शिजवलेला हा जादुई भात तुम्ही कधी पाहिला आहे का, जीआय टॅग मिळालेला आसामचा हा चमत्कार
मात्र त्याचे रुपांतर शेणखत, कंपोस्ट खत व इतर सेंद्रिय खतांमध्ये करून ती शेतात गाडली गेली तर ते अधिक हितावह ठरते.. त्यामुळे सेंद्रिय पदार्थातील नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पिकांकडून कार्यक्षमतेने केला जातो. जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय कर्बनयुक्त पदार्थाचे कुजण्याच्या क्रियेमुळे कार्बनडाय- ऑक्साइड वायूत रुपांतर केले जाते. या वायूचा वापर मग प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेत केला जातो.जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचा एक गट मोठ्या वनस्पतींप्रमाणे हवेतील कार्बन डाय- ऑक्साइड वायूमधील कर्ब शोषून घेतो, तर दुसऱ्या गटातील सूक्ष्म जिवाणू पिकांच्या अवशेषांवर अवलंबून असतात. दुसऱ्या गटातील जिवाणूंची संख्या पहिल्या गटातील सूक्ष्म जिवाणूंपेक्षा अधिक असते.
आता अर्ध्या पाण्यात पीक तयार होणार, उत्पादनही मिळणार बंपर, जाणून घ्या काय आहे ‘दक्ष’ धान
हे जिवाणू स्वतःच्या शरीर पेशींच्या निर्मितीसाठी यातील कर्ब वापरतात आणि उरलेल्या कर्बाचे कार्बनडाय ऑक्साइड वायूत रुपांतर करतात. हा वायू मग जमिनीतून हवेतील वातावरणात प्रवेश करतो. वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड शेतातील पिकांकडून शोषला केला जातो. सूक्ष्म जिवाणूंचे जीवनचक्र पूर्ण झाल्यावर ते मरतात. त्यांचे अवशेष पिकांच्या अवशेषांबरोबर जमिनीत मिसळले जातात. त्यावर पुन्हा जमिनीतील सूक्ष्म जिवाणू तुटून पडतात.. त्यामुळे निर्माण झालेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू पिकांच्या वाढीस उपलब्ध होतो. अशाप्रकारे वनस्पतींच्या शरीरात हवेतील कार्बनडाय ऑक्साइड वायूचे रुपांतर क्लिष्ट अशा संयुगात घडूनयेते. नंतर या किष्ट संयुगांचे रुपांतर साध्या संयुगात घडून पुन्हा कार्बन डाय- ऑक्साइड वायू निर्माण होण्याच्या या क्रियेला निसर्गातील ‘सेंद्रिय कर्बनचक्र’ असे म्हणतात. सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील महत्त्वाचा घटक आहे.
जमिनीची सुपीकता कमी होण्याची मुख्य कारणे
त्याची कमतरता अधिक तर जमिनीची सुपीकता कमी. म्हणजेच पीक उत्पादनात घट. उलटपक्षी कर्बाचा पुरवठा अधिक तर जमिनीची सुपीकता अधिक. म्हणजेच उत्पादनात वाढ. जमिनीतील या सेंद्रिय कर्बावर सूक्ष्म जिवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्ध, जलधारणशक्ती, मातीच्या कणांची जडणघडण म्हणजे फूल इत्यादी अनेक गुणधर्म निगडीत असतात. जमिनीतील उष्ण हवामानामुळे व जैविक क्रियेमुळे सेंद्रिय पदार्थाचे विघटन व त्यातील अन्नद्रव्यांचे भस्मीकरण या क्रिया सतत चालू असतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हळूहळू कमी होते. हे प्रमाण कायम राखण्याचे कार्य सेंद्रिय खतांच्या वापरामुळे होऊ शकते. त्यासाठी शेतावर व आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अवशेषांचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. त्यामध्ये धसकटे, पेंढा, ताटे, तूस, भुसा, पालापाचोळा, गवत, तण, जनावरांची विष्ठा व उत्पादिते यांचा वापर सेंद्रिय खते बनविण्यासाठी केला पाहिजे….
धन्यवाद.
माहिती संकलन
मिलिंद जि गोदे
प्रा. प्रमोदजी मेंढे सर यांनी संपूर्ण माहिती शेती शाळेच्या माध्यमातून प्रधान केली
रासायनिक खत सोडा….. या शेवाळामुळे पिकाचे उत्पादन वाढेल, फक्त 1 लिटरच्या बाटलीतून मिळेल जोरदार फायदे