जमिनीची सुपीकता कमी होण्याची मुख्य कारणे

Shares

नमस्कार शेतकरी बांधवांनो जमिनीत असणारी अन्नद्रव्ये निरनिराळ्या मार्गांनी कमी होतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता घटते. आपल्याकडील जमिनीत पीक उत्पादन करताना जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. एका अंदाजानुसार भारतातील जमिनीतून दरवर्षी सुमारे ४० लाख टन नत्र पीक उत्पादनात बाहेर काढला जातो. मात्र त्याच्या जागी परत जमिनीस दिला जाणारा नत्र सुमारे १० लाख टन इतकाच असतो. निरनिराळी पिके त्याच्या वाढीसाठी जमिनीतून अन्नद्रव्ये काढून घेतात.पिके जमिनीमधून नत्र आणि पालाश मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात आणि स्फुरद, मॅग्नेशिअम आणि गंधक त्यामानाने कमी प्रमाणात शोषून घेतात.पिकातील तणांची वाढ खूपच जोरात होते व त्यामुळे बरीचशी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेतली जातात. विविध पिकांमधील तणामुळे होणारा अन्नद्रव्यांचा नाश त्यावरून तणे पिकांचे अन्न मोठ्या प्रमाणात खात असतात.

आनंदाची बातमी ! मोहरीसह या तेलांचे दर घसरले, जाणून घ्या नवे दर

नत्रयुक्त खतांचा बऱ्याच प्रमाणात नाश हा निचऱ्यामार्फत होतो. जमिनीच्या ऋणायन विनिमय ग्रहणशक्तीनुसार अमोनिया वायूचा नाश वालुकामय जमिनीमधून नत्राचा नाश लवकर होतो.ग्रामीण भागात जळणासाठी पुरेसा लाकूडफाटा मिळत नसल्यामुळे उपलब्ध शेणापैकी जवळजवळ निम्मे शेण गोवऱ्या करण्यासाठी वापरले जाते व त्यामुळे अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. वास्तविक हे शेण खतासाठी वापरणे आवश्यक आहे.पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील जमिनीवरून सुमारे ५० कोटी टन सुपीक माती आणि सुमारे ५ लाख टन पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात. भारतामधून” सुमारे ६०० कोटी टन माती व सुमारे ५० लाख टन पोषक अन्नद्रव्ये दरवर्षी वाहून जातात असा अंदाज आहे.

रासायनिक खत सोडा….. या शेवाळामुळे पिकाचे उत्पादन वाढेल, फक्त 1 लिटरच्या बाटलीतून मिळेल जोरदार फायदे

खतांचा संतुलित वापर पिकांच्या वाढीकरिता खतांची योग्य मात्रा ठरविण्यासाठी जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता, पिकाची जात, निरनिराळ्या पोषक अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याचे प्रमाण, रोग व किडींचा प्रादुर्भाव, जमिनी व पाणी व्यवस्थापन, खताची बाजारातील किंमत, मालाला मिळणारा बाजारभाव इत्यादी गोष्टी विचारात घ्यावयास पाहिजेत. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता कोणत्याही पिकाला लागणारी अन्नद्रव्यांची मात्रा ही जमिनीची मृदा-चाचणी करून ठरवायला हवी कारण मृदा चाचणीवरून जमिनीत अन्नद्रव्यांचा पुरवठा किती आहे आणि अधिक किती अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीत अथवा पिकास करायला हवा याचा अंदाज येतो. मात्र जास्त उत्पादन येण्यासाठी शेतकरी प्रमाणापेक्षा जास्त खते घालतो. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते आणि उत्पादन घटते. अशावेळी मृदा चाचणी करून खते घातल्यास पिकांचे उत्पादन हमखास वाढते. खताच्या योग्य मात्रा वापरण्यासाठी सर्वसाधारणपणे खालील पद्धती वापरता येतात.

मातिची सुपिकता हा विषय आज चिंतनाचा – एकदा वाचाच

मृदा चाचणी

या पद्धतीमध्ये शेतमातीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण केले जाते. जमिनीच्या सुपीकतेचे तिच्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार सहा वर्ग पाडले जातात. उदा. खूप कमी, कमी, मध्यम, मध्यम, जास्त आणि खूप जास्त.जमिनीच्या परीक्षणा वरून आलेल्या अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार पारंपरिक खताच्या मात्रेचा आधारे घेऊन अनुक्रमे शिफारस केलेल्या ख़तमात्रेच्या १५० टक्के, १२५ टक्के, १०० टक्के, ८० टक्के, ६० टक्के आणि ४० टक्के खताची मात्रा ठरविली जाते. जमिनीची सुपीकता निर्देशांक सुध्दा नव्या पद्धतीने काढून खतविषयक सल्ला दिला जातो. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेल्या मृदा परीक्षण व खताचा पिकांस प्रतिसाद या शेतीवरील प्रयोगाच्या आधारे तयार केलेली आहे. ही पद्धत जास्त कायदेशीर ठरली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मृदा चाचणी प्रयोगशाळांमध्ये खताच्या पर विषयक सल्ला या पद्धतीने दिला जातो.या पद्धतीमध्ये एक लहानसा दोष आहे आणि तो म्हणजे पिकांना द्यावयाच्या खताच्या मात्रा ह्या ढोबळमानाने ठरविल्या जातात.

येत्या काळात पीठ, तांदूळ आणि तेल स्वस्त होणार! या पिकांच्या क्षेत्रात बंपर वाढ

अन्नद्रव्यांची सीमांत मूल्यपातळी

निरनिराळ्या जमिनीतून मूलद्रव्यांचा पुरवठा कमी अधिक प्रमाणात होतो. ज्या मूल्यापर्यंत दिलेल्या खताला पीक वाढीचा परिणाम निश्चित आणि मोठ्या प्रमाणात मिळतो त्या मूल्यांच्या पातळीला अन्नद्रव्यांची सीमांत मूल्य पातळी असे म्हणतात. या पद्धतीमध्ये शेतजमीन किंवा वनस्पती यांच्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण एका ठरावीक पातळीच्या खाली गेल्यास खतामधून घातलेल्या अन्नद्रव्यास मिळणारा प्रतिसाद कमी कमी होत जातो. सीमांत मूल्य हे जमीन आणि पिकांनुसार बदलते. या पद्धतीमध्ये नमुना घेण्याची ठरावीक वेळ आणि नमुन्यासाठी वनस्पतीचा ठरावीक भाग यास खूप महत्त्व आहे.

तर शेतकरी आत्महत्या नाही करणार

मात्र एकाच पिकासाठी व एकाच प्रकारच्या जमिनीसाठी मूल्य एकच असते. त्यामुळे जादा खत नेमके कोठे द्यावे आणि ते दिले असताना किती प्रमाणात प्रतिसाद मिळेल याचा अंदाज येतो. या पद्धतीमध्ये जमीन आणि वनस्पती या दोहोंचे पृथ:करण करून जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये किंवा वनस्पतीमधील अन्नद्रव्यांचे शेकडा प्रमाण आणि उत्पादन यांचा आलेख काढला जातो आणि त्यावरून अन्नद्रव्यांची सीमांत मूल्य पातळी ठरविली जाते. या पद्धतीत खताची मात्रा ढोबळ मानाने ठरविता येते.

बाजरी 2023: जगातील सर्वात जुने पीक अजूनही मजबूत उत्पन्नाचे स्त्रोत आहे, जाणून घ्या काय आहे बाजरीमध्ये विशेष

लक्षणावर आधारित शिफारस

ही एक बहुव्यापक पद्धती असून पिकाच्या उत्पादनासाठी सर्वांगीण पोषक बाबींचा या पद्धतीत विचार केला आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये वनस्पती उती आणि मृदाचे कण हवामान आणि सुधारित शेतीचे घटक यांचा पीक उत्पादनासाठी एकत्रित विचार केला आहे. त्यामुळे वनस्पतीच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत अन्नद्रव्यांची चिकित्सा करता येते आणि लागणारी अन्नद्रव्ये जरुरीप्रमाणे पिकांना देता येतात. त्यामुळे उत्पादनात चांगलीच वाढ होते. पाने किंवा देठ यांच्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये त्यांचे एकमेकांशी असणारे गुणोत्तर हे ठराविक पातळीपेक्षा किती प्रमाणात कमी जास्त आहे याचा उपयोग केला जातो.या पद्धतीमध्ये शेतावर मोठ्या प्रमाणावर वनस्पती निवडल्या जातात. प्रत्येक ठिकाणी त्या वनस्पती व मातीचे नमुने गोळा केले जातात. तसेच ज्या पिकास दिलेली खते, कीटकनाशके, संजीवके, ऑक्झिन, हवामान, मशागत पद्धती वगैरे माहिती गोळा केली जाते. या पद्धतीमध्ये वनस्पतीमधील तौलनिक पोषक अन्नद्रव्ये, पानाच्या ऊतीतील अन्नद्रव्ये, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये, वनस्पतीच्या शरीर क्रिया, वाढीच्या अवस्था, अन्नद्रव्याची चिकित्सा आणि पिकाच्या उत्पादनावर आधारित अन्नद्रव्यांची इत्यादी बाबींचा समावेश असल्याने ही पद्धत खूपच प्रगत आहे….

आता मध व्यवसायात तोटा होणार नाही, शास्त्रज्ञांनी लावला मधमाशांचे संरक्षणात्मक आवरण, वाचा सविस्तर

धन्यवाद

प्रा. श्री प्रमोद न मेंढे सर

कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती१

(मृदा शास्त्र)

वरील माहिती माझे गुरू आदरणिय मेंढे सर यांच्या नेतृत्वाखाली संकलित केली आहे.

मिलिंद जि गोदे

कुक्कुटपालन : कोंबडी अंडी घालायला लागते म्हणून खाद्य कधी आणि किती घालावे, कोंबडीकडून अंडी घेण्याचा फंडाही जाणून घ्या!

या ३५ वस्तूंवर वाढू शकते Custom Duty ,जाणून घ्या काय होईल महाग!

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *