कांद्याच्या भावापेक्षा लागवडीसाठी जास्त खर्च , शेतकरी त्रस्त.
सध्या अनेक तालुक्यामध्ये कांदा लागवडीची ( Onion Cultivation) प्रक्रिया सुरु आहे. त्यात मजुरांचे भाव (Rate) वाढले असल्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी मजुरांना अधिकचे रुपये देऊन कांदा लागवड करण्यासाठी धरपड करत आहे. तर काही शेतकरी रोपे तयार करून कांदा लागवड करत असतात. त्यामुळे शेत मजूर मिळणे मुश्किल झालेले आहे. शेतकरी (Farmers) शेतमजुरांना लागवडीच्या वेळेस माफक अश्या दरात मजुरी देत असून नियमानुसार हा दर योग्य होता. परंतु काही शेतकऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त दर शेतमजुरांना दिल्यामुळे शेत मजूर जिथून जास्त दर मिळत आहे तिथे काम करण्यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत.
हे ही वाचा (Read This Also ) विधवा महिलांसाठी पेन्शन योजना !
सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे शेत मजुरांना देण्यासाठी जास्त रक्क्म नसल्यामुळे त्यांची फार अडचण होतांना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे कांदा लागवड करण्यास उशीर होत आहे. काही शेतकऱ्यांकडून जास्त दर मिळत असल्यामुळे शेत मजुरांची धावपळ होत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कांदा लागवड करणे गरजेचे आहे. लागवडीची वेळ निघून गेल्यावर पिकांची शाश्वती देता येत नाही. त्यात कांद्याचे दर देखील वाढलेले आहेत. मात्र कांद्याच्या दरापेक्षा कांदा लागवडीसाठी जास्त खर्च लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवीन प्रश्न पडला आहे.