तुम्हाला बदक पालन करायचं आहे का ? मग हे नक्की वाचा
तुमच्याकडे लहान तळी, मोठी तळी, शेततळी, गावतळी, धरणं उपलब्ध असेल किंवा भाताची शेती करत असाल तर तुम्ही बदक पालन करू शकता.अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय करता येऊ शकतो .दक्षिणेत बदक व्यवसाय हा मेंढपाळीसारखा आहे. बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो. बदकाचं मुख्य खाद्य म्हणजे भात शेतीतल्या गोगलगाई, तसेच अनेक प्रकारच्या किडी, पाण वनस्पती, शेवाळ, पाण्यातील किडे, जीवजंतू, गांडुळे, कृमी, हिरव्या वनस्पती इतकेच नाही तर बदके ज्वारी, बाजरीचे दाणे, कडधान्यांचे दाणे देखील खातात.
बदक पालन व्यवसायाची वैशिष्टे –
१. बदकांची जीवनप्रणाली ही व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचीच आहे.
२. बदकाच्या घर व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येत नाही.
३. एका गावातून दुसऱ्या गावात जिथे जाण्याची उपलब्धता असते तिथे जातात.
४. रात्रीच्यावेळी बदके शेतात एका ठिकाणी ठेवतात आणि सकाळी अंडी गोळा करतात.
५. शिवाय रात्रभर शेतात बसवल्याबद्दल (मूत्र खत यांच्या मोबदल्यात) शेतकऱ्यांकडून पैसेही घेतात.
६. कोंबडीच्या तुलनेत बदकांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.
७. कोंबड्यांपेक्षा वाढही जलद होते.
८. बदकांची अंडी मोठी असून ते देण्याचे प्रमाणही जास्त असते.
९. बदके रात्रीच्यावेळी अंडी देतात.शक्यतो १००% बदके रात्री ते सकाळी ९ वाजेपर्यंत अंडी घालतात आणि त्यानंतर त्यांना चरायला सोडता येतं.
बदक पालन व्यवसायाचे फायदे –
१. बदके चरायला सोडल्यानंतर स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. चरणे झाल्यानंतर रात्री मूळ जागेवर येण्याची त्यांना तंतोतंतपणे सवय लावता येते.
२. बदकामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं.
३ . १०० % बदके रात्री ते सकाळी ९ पर्यंत अंडी घालतात. त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी पदरात पडतात.
३. बदक कळपात राहत असल्याने त्यांची संरक्षण मॅनेजमेंट सोयीची असते.
४. यांची अंडी मोठी असून पौष्टिक असतात.
५. दलदलीच्या रेताड पाणथळ जागेवर बदकपालन करता येते. देखभालीवराचा खर्च कमी होतो.
बदक पालनव्यवसाय बद्दल माहिती –
बदक प्रजोत्पादनासाठी १० महिन्यांनी तयार होतात. ५-६ महिने झाले की ते अंडी देतात. एक नर ४ -५ माद्यांसाठी ठेवावा. बदकांना मुबलक पाणी असावेच लागते. ६’ × ६’ × १.५’ च्या टाक्यात १० बदके पाळता येतात. पाण्याच्या उपलब्धते जवळच बांबू, तुराट्या, तट्ट्याच्या साह्याने घर करता येते . प्रत्येक बदकास २ चौ. फुट जागा पुरेशी होते. घराभोवती कंपाउंड करून मोकळी सोडवीत. कोंबड्यांच्या खाद्याप्रमाणे प्रथिनयुक्त उर्जायतुक्त रोज १२० ते १५० ग्रॅम खाद्य द्यावे. ७ आठवड्यांत ८ किलो खाद्य खाऊन २.५ किलो वजनाची बदके होतात. कोंबडीच्या पिलांप्रमाणे पिल्लांची जोपासना करावी लागते .
सुरुवातीला ३० सें. ग्रॅ. तापमान ठेवावे नंतर दर आठवड्याला ३.४ सें. ग्रॅ. नी तापमान कमी करीत जावे सुरुवातीला प्रथिने आणि उर्जा मिळवण्यासाठी खाद्य द्यावं. ते वय वाढीनुसार वाढवावे.चौथ्या आठवड्यांपासून पिल्लांना मोकळं सोडावं. पाणी सतत पाहिजेत नाही तर डोळ्यांचे विकार होतात.
बदकांच्या मांस उत्पादनासाठी मस्कोव्ही, पेंकिंग या जाती आहेत. बदकांच्या अंडी उत्पादनासाठी ऑरपिंगटन, खाकी कॅम्पेबल, इंडियन रनर, म्यॉग पाईन व्हाईट स्टॅनब्रिज या जाती असून खाकी कॅम्पेबल आणि इंडियन इंडियन रनर या दोन जाती आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळतात . त्या वर्षाकाठी ३०० अंडी देतात, इतर जाती वर्षाकाठी १७५ ते २५० अंडी देतात. शोभेची बदके शोभिवंत, देखणी असून सोनेरी, लाल, जांभळी, निळी, काळी, पांढरी. पिवळी इ. छटायुक्त असतात. टील विडजन, पिनटेन, करोलिना शोव्हेलियर या जाती शोभिवंत बदकाच्या आहेत.थोडे परिश्रम आणि थोडे भांडवल जर असेल तर तुम्ही बदक पालन नक्की करू शकता.