रोग आणि नियोजन

चवळी वरील कीड व रोग व्यवस्थापन

Shares

शेंगवर्गीय भाजीपाला पिकांच्या कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी वापर होतो. वाळलेल्या बियांचा उसळ किंवा डाळीसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

रोग व कीड नियंत्रण –
१. भुरी – भुरी हा बुरशीजन्य रोग असून, रोगाची सुरवात पानाच्या दोन्हीं। बाजूंवर काळपट डागांनी होऊन नंतर संबंध पानावर पांढरी पावडर शिंपडल्यासारखे दिसते. रोग, खोड आणि शेंगावरही पसरतो. रोग बहुतेक उशिरा येतो.
उपाय – या रोगाच्या नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रण (मोरचूद १ किलो : १ किलो कळीचा चुना+१०० लिटर पाणी) फवारावे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात, तसेच बॅलेटोन हे औषध २५० ग्रॅम+५०० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

२. करपा – हा रोग बुरशीजन्य असून दमट, पावसाळी आणि थंड हवेत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगामुळे खोड, पाने,शेंग बियांवर लांबट खोल आणि काळपट लाल चट्टे पडतात. त्यामुळ पान करपून गळून पडतात आणि शेंगांना बी धरत नाही. उत्पादनात घट येते.
उपाय – पिकाचे बी वापरू नये. कारण बियांपासून रोगाचा प्रसार होतो. पेरणीपूर्वी बी ०.१२५ टक्के सिरसॉनच्या द्रावणात अर्धा तास बुडवावे किंवा बियांना थायरम हे औषध प्रतिकिलोस ३ ते ४ ग्रॅम या प्रमाणात चोळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी. लागवड केल्यापासून वाढीच्या काळात बाविस्टीन १ ग्रॅम किंवा कापर ऑक्सीक्लोराइड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३-४ फवारण्या कराव्यात.

३. तांबेरा – दमट आणि पावसाळी हवेत हा रोग प्रामुख्याने आढळतो. रोगाचीसरवात पानाच्या खालच्या बाजूवर बाराक, काळपट, तपकिरी गीत ठिपक्यांनी होते. पाने पिवळी पडून गळून पडतात.
उपाय – रोगाची सुरवात होण्याआधीच हेक्टरी २५ किलो गंधकाची भकटी (३०० मेश) धुरळूस रोगाचे नियंत्रण होते.

४. सोंड्या भुंगा – पीक शेतात असताना हे भुंगे शेंगा पोखरतात आणि साठवणीत बियांना छिद्र पडून बियांचे नुकसान करतात.
उपाय – फॉस्फोमिडॉन (८५ डब्ल्यूएससी) हे औषध (१०० मिली+५०० लिटर पाणी ) प्रतिहेक्टरला पिकावर फवारावे. साठवणीतील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी १.५ ते ४ किलो कार्बनडाय सल्फाईड हे औषध प्रतिएक हजार घनफूट साठवणीतील जागा या प्रमाणात वापरावे.

५. मावा – हिरव्या किंवा काळपट रंगाचे हे बारीक किडे पानातील अन्नरस शोषून घेतात. वेळीच बंदोबस्त न केल्यास पिकाचे अतोनात नुकसान होते. व्हायरस रोग इतर चांगल्या झाडांवर पसरविण्याचे कार्य मावा किडीमार्फत होत असल्याने या किडीचे नियंत्रण पूर्णपणे करणे आवश्यक आहे.
उपाय – मावा किडीचे नियंत्रण करण्यासाठी फॉस्फोमिडॉन (८५ डब्ल्यूएससी) १०० मिली किंवा अॅसिफेट २५० मिली किंवा डायमिथोएट ३० ईसी ४०० मिलिओ, ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारावे. मॅलीथिऑन ५ टक्के पावडर हेक्टरी २५ किलोप्रमाणे फवारावी.

६. शेंगा पोखरणारी अळी – ही तपकिरी रंगाची अळी शेंगा पोखरून आत शिरते व बियांचे नुकसान करते.
उपाय – कीड थोड्या प्रमाणात असल्यास अळ्या हातांनी वेचून नष्ट कराव्यात, फॉस्फोमिडॉन (८५ डब्ल्यूएससी) हेक्टरी १०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

शेंगावर किडींचा आणि अळी चा प्रभाव थांबवला आणि चांगल्याप्रकारे नियोजन केले तर याचे मोठ्या प्रमाणात आणि चांगले पीक होऊ शकते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *