केंद्राचा मोठा निर्णय, ‘झिरो बजेट शेती’ गावपातळीपर्यंत राबवणार
शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीचा (Natural Farming) वापर करून अधिकाधिक प्रमाणात शेती करावी यासाठी केंद्र सरकार (Central Government) अनेक प्रयत्न करत आहेत. सरकारने आता झिरो बजेट शेतीसाठी (Zero Budget Farming) अगदी तळागळापर्यंत यंत्रणा राबवली आहे. अगदीच सर्व शेतकऱ्यांपर्यंत कशी झिरो बजेट शेतीची माहिती पोचवता येईल याकडे जास्त लक्ष देत असून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा सरकारचा हेतू आहे. यामध्ये कृषी ( Agriculture ) विज्ञान केंद्रांना देखील शामिल करून घेतले आहे. झिरो बजेट शेतीचा प्रचार तसेच प्रसार व्हावा यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करत आहे.
गावपातळीवर करणार प्रयोग
मागील काही दिवसापासून नैसर्गिक शेतीची चर्चा सर्वत्र सुरु होती. देशाच्या पंतप्रधानांनी आता नैसर्गिक शेतीवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असून त्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विज्ञान केंद्राला देखील यामध्ये शामिल करून घेतले आहेत जेणेकरून गावपातळीवर झिरो बजेट शेती पद्धतीचे प्रात्यक्षिक तसेच प्रयोग करून दाखवण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटेल. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे त्यामुळे त्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
हे ही वाचा (Read This ) युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न
झिरो बजेट शेती
नैसर्गिक शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण – गोमुत्राचा ( Cow Urine ) जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी( Water) टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यास पिकांची उत्तम वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. नैसर्गिक शेतीस अत्याधुनिक तंत्राची जोड दिल्यास उत्पादनात जास्त प्रमाणात वाढ होईल. अनेक शेतकऱ्यांना भीती आहे की नैसर्गिकरीत्या शेती केल्यास उत्पादनात घट होईल. परंतु असे न होता त्याचा फायदाच होणार आहे. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्च देखील वाचेल. शेती मध्ये हा बदल घडवून आणणे ही आता काळाची गरज झाली आहे. गुजरात , अनेक शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. हा बदल देशातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर स्वीकारावा. जेणेकरून त्यांचा अधिक फायदा होईल.