या पिकाची शेती करून बाराही महिने कमवा लाखों रुपये
शेतकरी सतत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात असतो. आपण आज अश्याच एका पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. मेहंदीची शेती ही संपूर्ण भारतभर केली जात असून मेहंदीची मागणी बाराही महिने केली जाते. कार्यक्रम कोणताही असो मेहंदीशिवाय तो कार्यक्रम अपूर्णच असतो. त्याचबरोबर केसांना कलर करण्यासाठी देखील मेहंदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मेहंदीच्या पिकास सर्व हवामान मानवते. कोरडे, कमी पाऊस, शुष्क हवमानात हे पीक अधिक उत्तम येते. मेहंदीची शेती गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब येथे प्रामुख्याने केली जाते. मध्य प्रदेशमध्ये हिना मेहंदीचा उपयोग अत्तर, सुगंधित तेल यासाठी केला जातो.
हे ही वाचा (Read This ) या दिवशी मिळणार किसान सन्मान निधी योजनेचा ११वा हफ्ता ?
मेहंदी पिकाची लागवड
१. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मेहंदी पिकाची लागवड केली जाते.
२. प्रति एकर प्रमाणे २ किलो बियाण्याची पेरणी करावी.
३. साधारणतः ८ महिन्यांनी हे पीक कापणीस तयार होते.
४. या पिकाची कापणी दुसऱ्या वर्षांपासून दोनदा करता येते.
५. या पिकाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून शेतात कुजलेले शेणखत टाकावेत.
६. पेरणी करण्यासाठी शक्यतो पूर्व तयार रोपांचा वापर केला जातो.
७. या रोपांचे वय हे किमान १०० दिवसांचे असावे.
८. रोपातील अंतर ४५ ते ३० सेमी पर्यंत ठेवावेत.
९. सिंचन लागवडी नंतर लगेच पाणी द्यावे आणि झाडांमध्ये ओलावा राहील याची काळजी घ्यावी लागते.
उत्पादन आणि नफा
१. मेहंदी पिकाचे दरवर्षी प्रमाणे ६ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते.
२. बाजारपेठेत मेहंदी ५५ ते ७० रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले जाते.
३. मेहंदीचे पीक बाराही महिने घेता येत असून याची मागणीदेखील बाराही महिने मोठ्या प्रमाणात केली जाते.