गावखेड्यात बैलगाडा शर्यतीचा धुमाकूळ, बैलांच्या किंमतीत वाढ
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यापासून गाव शिवारामध्ये शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या शर्यतीमध्ये अनेक बैलजोड्या अगदी उत्साहाने सहभाग घेत आहेत. तर नुकतीच एक बैलगाडा शर्यत बाळापूर तालुक्यातील देगावच्या काळ्या मातीमध्ये पार पडली.
या शर्यतीमध्ये १०० मीटर अंतर ६ सेकंदात पार करून ५८ पॉईंट घेत माकणी येथील बैलजोडीने पहिला क्रमांक मिळवला. बैलगाडा शर्यतीमुळे आठवडी बाजारामध्ये बैलजोडीची किंमत वाढली आहे.
हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
गावखेड्यामध्ये उत्साहाचे वातावरण
मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे सतत भरलेले दिसलेले पट हे बंद झाले होते. आता बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे.
एवढेच काय तर मोठ्या प्रमाणात बैलजोड्या या शर्यतीमध्ये सहभागी होत आहेत. तर तरुण शेतकरी बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. त्यामुळे आता कोरोनामुळे आलेली मरगळ दूर होतानाचे चित्र दिसत आहे.
हे ही वाचा (Read This) आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!
बैलजोडीला मिळतोय लाखोंचा भाव …
मध्यंतरी बैलगाडी शर्यंत बंद आणि कोरोनामुळे आठवडी बाजारही बंद होते. यामुळे खिलार बैलाचा बाजार उठलाच होता. मात्र बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून शर्यतीसाठी खिलार जोडीला अधिकची मागणी होत आहे.
बैलगाडा शर्यत सुरु झाल्यापासून बैलजोडीला लाखोंचा भाव मिळत आहे. त्यामुळे बैलजोडी मालक आनंदात दिसत आहेत.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !