25 वर्ष काळ्या आईची सेवा करणाऱ्या सर्जा राजाचं निधन – शेतकऱ्याने जाणीव ठेऊन केला दशक्रिया विधी
शेतकरी (Farmer) दोन गोष्टींची सर्वाधिक काळजी करत असतो. त्या २ गोष्टी म्हणजे पीक आणि बैलजोडी. शेतकरी अगदी आपल्या मुलाप्रमाणे आपल्या पशुची काळजी घेत असतो. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या बैलाच्या (Bull) मृत्यूनंतर त्याचा विधी करून गाव (Village) जेवण ठेवले होते. जवळ जवळ २५ वर्षे याने आपल्या काळ्या आईची सेवा केली तसेच यामुळे घराला खऱ्या अर्थाने समृद्धी मिळाल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. या बैलाचे वृद्धापकाळाने २५ डिसेंबर रोजी निधन (Death) झाले.
काळाच्या ओघात शेतीला यांत्रिकिकरणाची जोड मिळाल्याने सर्वकाही सोईस्कर झाले आहे. पण 25 वर्षापूर्वी शेती ( Agriculture) मशागतीसाठी आणि अन्य कामासाठी बैलजोडीशिवाय पर्यायच नव्हता. सर्जा-राजा शेतात राबल्यामुळे घरात समृध्दी आली असे बैलमालकाने सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून मिळवा ३ लाख ३ महिन्यात, मिळणार ७५% सरकारी अनुदानही.
चौकाचौकात लावले बॅनर
बैलाच्या निधनानंतर बैलमालकाने गावात जेवणाचा कार्यक्रम ठेवला असून गावातील चौकाचौकात सर्जाचे भावपूर्ण श्रध्दांजलीचे बॅनर झळकत होते. त्यामुळे गावातच नाही पंचक्रोशीत बैल आणि शेतकरी यांच्यातील नात्याची चर्चा झाली होती. शिवाय सिरसाळा हे गाव महामार्गावरच असल्याने सर्जाचे बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्याच बरोबर त्यांनी सांगितले की , हा बैल आमच्या नेहमी आठवणीत राहील तसेच सर्जाच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो.