कापूस दरवाढीला १० हजारांवर ब्रेक, शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न साठवणूक की विक्री ?
सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत होता तर जानेवारीमध्ये तर ११ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. मात्र आता दरामध्ये स्थिरता दिसून येत आहे. कापसाला चांगल्या संख्येने मागणी असूनही दरामध्ये स्थिरता निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याची युद्धजन्य परिस्थिती.
ही वाचा (Read This) या कीटकनाशकांवर बंदी, पिकांसह मानवी आरोग्यावर होत होता वाईट परिणाम
कापसाचे दर हे सध्या ८ हजार ते १० हजार च्या दरम्यान स्थिर झाले आहे. त्यामुळे आता कापसाची साठवणूक करावी की विक्री असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. युद्ध थांबल्यानंतर बाजारपेठेतील दर हे सुधारतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांनी सध्या बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करून कधी विक्री आणि कधी साठवणूक करावी हे ठरवावे. तर सध्या बघ्याची भूमिका घेणे उचित ठरेल, असे सांगितले जात आहे.
तर कापसाच्या मागणीत थोड्या ही प्रमाणात घट झाली नाही तर सध्या कापसाच्या दरात स्थिरता ही सध्याच्या परिस्थितीमुळे आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री टप्याटप्याने केल्यास त्यांना अधिक फायदा होणार आहे.
ही वाचा (Read This) ई-पीक नोंदणीसाठी अखेरची मुदत वाढ, १५ मार्च अंतिम तारीख
दरातील तफावत …
सुरुवातीला कापसाला अधिकच दर होता तर त्यानंतर हे दर थेट ४ हजार ते ७ हजारांवर पोहचले होते. नंतर पुन्हा कापसाच्या दराने चढता क्रम पकडला तर १० वर्षातील विक्रमी दर कापसाला मिळाला होता.
युद्ध सुरु झाले तेव्हा कापसाच्या दरामध्ये घट झाली होती. मात्र ही घट तात्पुरती होती. कापसाच्या दराचा त्याच्या मागणीवर काहीही परिणाम झाला नव्हता. यंदा कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे दर वाढ होणार हे निश्चित होते.
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत कापसाची मागणी अजूनही होत आहे त्यामुळे कापसाचे दर हे पूर्वीप्रमाणे होतील असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.