बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढ आणि सिंचन व्यवस्थापण योग्य पद्धतीने व्हावं या उद्देशाने राज्य शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंमलात आणली आहे. ही योजना राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली आहे.
अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना अनुदान खाली प्रमाणे आहे.
१) नवीन विहीर २,५०,०००/-
२) जुन्या विहीर दुरूस्ती ५०,०००/-
३) इन्वेल बोअरिंग २०,०००/-
४) पंप संच झिझेल किंवा विद्युत पंप २०,०००/-
५) वीज जोडणी आकारण्यासाठी १०,०००/-
६) शेततळ्यात प्लास्टिक अस्तिरिकरण १०००००/-
७) सूक्ष्म सिंचन संच व ठिबक सिंचन संच ५०,०००/-
८) तुषार सिंचन २५,०००
९) पीव्हीसी पाईप व एचडीपीई पाईप ३०,०००/-
या योजनेत वरील बाबीचा समावेश असून यासर्व गोष्टींचा पॅकेजच्या स्वरूपात लाभ शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. योजनेचे तीन प्रकारात पॅकेज ठरलेले आहेत.
१) शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करणे
• शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करणे,वीज जोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच, पंप संच, पीव्हीसी पाइप, एचडीपीई पाईप व परसबाग .
• ज्या शेतकऱ्यांने योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन पंप, पंप संच, पीव्हीसी पाइप, एचडीपीई पाईप व परसबाग यासाठी अनुदान आहे.
• वरील काही वस्तू साधन शेतकऱ्यांकडे उपलब्द असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खलील घटकाची निवड करायला हवी.
वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन पंप, पंप संच
२) नवीन विहीर पॅकेज
• नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन पंप, पंप संच, पीव्हीसी पाइप, एचडीपीई पाईप व परसबाग आणि गरज असल्यास इन्वेल बोअरिंग.
३) जुन्या विहीर दुरुस्ती पॅकेज
• जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन पंप, पंप संच, पीव्हीसी पाइप, एचडीपीई पाईप व परसबाग आणि गरज असल्यास इन्वेल बोअरिंग.
पूर्वसंमती :-
पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांनी अंमलबजावणी करायची आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहे :-
१. या योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जमातीतील असणे बंधनकारक आहे.
२. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड लाख रुपया पेक्षा जास्त नसावं.
३. नवीन विहिरीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहिरी चा लाभ घेतलेला नसावा.
४. ७/१२ वर विहिरीची नोंद असेल तर तुम्हाला नवीन विहीरीसाठी या योजनेचा लाभ होणार नाही.
५. नवीन विहीर घेणार असला तर त्या ठिकाणाहून ५०० फुटापर्यंत विहीर नसावी.
६. नवीन विहिरी शिवाय तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा लाभ घायचा असेल तर किमान ०.२०हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे .
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-
१) ७/१२
२) ८अ
३) आधार कार्ड
४) उत्पन्नाचा दाखल (तहसील कार्यलयाचा आवश्यक)
५) नवीन विहितीसाठी भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणेचा पाणी असल्याचा दाखल.
६) जात प्रमाणपत्र
नवीन विहीर
पूर्वसंमती व कार्यरंभ आदेश :-
1)नवीन विहिरींसाठी निवड झाल्यास कृषी अधिकारी पंचायत समिती अधिकारी कार्यरभ आदेश देतात. त्यानंतर ३० दिवसाच्या आत काम सुरू करायला हवे.
शेततळे अस्तरीकरण:- शेततळ्यातील अस्तरीकरनासाठी ५०० मायक्रोन जाडीचा प्लास्टिक वापरायला हवं, रिईनफोल्ड एचडीपीई जिओ मेंटेनन्स फिल्म वापरावी.
ठिबक सिंचन संच :-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान तर या योजनेतून ३५ टक्के अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.
तुषार सिंचन संच :-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान तर या योजनेतून ३५ टक्के अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.
पंप संच :-
या योजनेतून लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाली की, एक महिन्याच्या आत पंप अधिकृत विक्रेत्याकडून पंप खरेदी करावा.
पाईप :-
पूर्वसंमती मिळल्यानंतर लाभार्थ्याने एक महिन्याच्या आत त्याच्या पसंतीनुसार आयएसआय मार्क पाईप खरेदी करावा . किमतीच्या १०० टक्के कमाल
३०००० हजार रुपय अनुदान आहे.
परसबाग :-
आदिवासी भागात शेतकरी कुटुंबासाठी लागणार भाजीपाला त्याला त्याच्या घराभोवती पिकवन शक्य आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला बियाणे भेंडी, गवार चवळी महाबीज इत्यादी कंपनीच्या अधिकृत परवाना धारक कंपन्यांकडून खरेदी करून 9अवती सादर करावी .
अनुदान:-
शेतकऱ्यांना मिळणार अनुदान इलेक्ट्रनिक फंड द्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात देण्यात येईल.
अर्ज कोठे करावा :-
www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळ वर करायला हवा.