ब्लॉग

बायोडायनॅमिक शेतीही महत्त्वाची ….एकदा वाचाच

Shares

मिलिंद जि गोदे – नमस्कार मंडळी आजचा लेख थोडा पण महत्वाचा आहे

बायोडायनॅमिक शेतीमध्ये शेतीला जिवंत पध्दती मानण्यात आली आहे. एकाचा दुसऱ्यावर परिणाम होतो हेही दाखवण्यात आले आहे. निसर्गामधील आध्यात्मिक ताकदीचा स्वीकार करण्यात आला आहे. पिकाची लागवड तारखा कॅलेन्डरनुसार निश्चित केल्या जातात. इ.एम. प्रमाणे यामध्ये ८ विशिष्ट उत्पादनांचा वापर करण्यात येतो. ही उत्पादने शेण, सिलिका, वनस्पतीच्या अर्काचा वापर करून कंपोस्ट निर्मिती, मानी आणि पिके यावर आधारित आहेत. ही सेंद्रिय पध्दतच आहे. त्यामध्ये शास्त्रीय पध्दतीने ह्यूमस निर्मिती होत असते. यामध्ये कमीअधिक प्रमाणात न कुजलेला, न सडलेला भाग नसतो तर पूर्णपणे कुजलेला भाग असतो. त्याला स्थिर ह्यूमस म्हटले जाते. एवढाच सेंद्रिय शेती व बायोडायनॅमिक पध्दतीमधील फरक आहे. यामध्ये निरनिराळी द्रावणे वापरून, ज्या वस्तूपासून ह्यूमस तयार केला जातो त्याला शेतात टाकायच्या अगोदर कुजवले जाते. या पध्दतीमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत.

कृषी क्षेत्रासाठी 2022 कसे होते, निर्यात-आयातीने महागाई किती वाढली, जाणून घ्या सर्व काही

१) जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवण्यासाठी ह्यूमसची सतत उपलब्धतता राखली जाते.

२) मातीमधील जीव-जिवाणू यांचा समतोल राखण्यात मदत होते. कारण जमीन जिवंत आहे. त्यामुळे जीव-जंतूच्या वाढीला पूर्ण वाव दिला जातो व त्यांना हेतूपुरस्सर सांभाळले जाते.

३) बायोडायनॅमिक्समध्ये उदा. नत्र, स्फुरद, पालाश, रासायनिक अनद्रव्याचे महत्व नाकारले जात नाही. परंतु कलात्मक पध्दतीने सेंद्रिय पदार्थाच्या वापरावर भर दिला जातो.

४) या पध्दतीत जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सर्व कलात्मक पध्दतीने आवश्यक पदार्थांचा वापर करण्याची शिफारस करण्यात येते. कारण पीक अबायोटीक वातावरणात उदा. तापमान, प्राणवायू, कर्बद्वि प्रणिलवायू, प्रकाश, पाणी इ. च्या सहाय्याने वाढत असते. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमुळे रासायनिक ऊर्जेत परावर्तित होत असतात.

५) बायोडायनॅमिक पध्दतीला पिकाला सजीव अस्तित्व मानण्यात येते. ते केवळ खनिज द्रव्याचेच बनले नसून त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेटस्, सेल्युलोज, पिष्टमय पदार्थ इ. सेंद्रियपदार्थांचीही महत्वाची भूमिका असते.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत तांदूळ, गहू आणि भरड धान्य मोफत देणार सरकार

६) बायोडायनॅमिक शेतीमध्ये इन्झाइम्स व संजीवके यांना विशेष महत्व दिले जाते.

७) जमिनीची सुपीकता कायम राखण्यासाठी पिकांचा फेरपालट, ज्यामुळे सुपीकतेचे प्रमाण कमी होते व ज्यामुळे वाढते अशी पिके आलटून पालटून घेतली जातात.

८) या पध्दतीत हिरवळीची खते व आच्छादन पिकालाही योग्य ते महत्व देण्यात आले आहे.

९) जमिनीची आरोग्यपूर्ण वातावरण निर्मितीसाठी वनसंरक्षण, पाणी व्यवस्थापन, जमिनीतील हवेचा पुरेसा पुरवठा करण्याच्या पध्दती वापरल्या जातात.

१०) बायोडायनॅमिक शेतीमध्ये जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. वाफसा, पाणी धरून ठेवण्याची शक्ती, दोन कणातील अंतर, टेक्श्चर यालाही महत्व देते.

आश्चर्यकारक ही कोंबडी शेंगदाणे, लसूण खाते… दिवसात 2, 4 नव्हे तर 31 अंडी घालते

बायोडायनॅमिक शेतीचे नियम आहेत.

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी बायोडायनॅमिक फवाऱ्यांचा वापर. पिकाची फेरपालट करत राहून रोग व किडीवर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि उपयुक्त सूक्ष्म जिवांची संख्या वाढवणे. शेतीतील टाकाऊ पदार्थांचा सतत पुनर्वापर .

धन्यवाद…!

मिलिंद जि गोदे
युवा शेतकरी
milindgode111@gmail.com

Save the soil all together

बाजरी ही तांदूळ आणि गव्हापेक्षा आरोग्यदायी आहे, ती सिंधू संस्कृतीतही वापरली जात होती

शुभ मंत्र: नवीन वर्षात या 9 मंत्रांनी मनोकामना पूर्ण होतील आणि आनंदात खूप वाढ होईल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *