बाराही महिने उत्पन्न मिळवून देणारी बटाटा लागवड
बटाटा सर्वांची लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात पुणे, सातारा, औरंगाबाद,नाशिक, अहमदनगर, बीड, नागपूर येथे बटाटा पिकाची लागवड केली जाते. बटाट्यामध्ये चुना, प्रथिने, फॉस्फरस यांसारखी खनिजे, क व ब जीवनसत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. बटाटा पासून विविच प्रक्रियायुक्त पदार्थ देखील बनवले जातात. बाराहीमहीने अत्यंत मोठ्या संख्येने बटाट्याची मागणी असते. बटाटा लागवडीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
जमीन व हवामान –
१. बटाटा पिकासाठी मध्यम ते हलकी गाळाची जमीन उत्तम ठरते.
२. बटाटा लागवडीसाठी कसदार भुसभुशीत जमीन निवडावीत.
३. पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन असणे आवश्यक आहे.
४. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असणारी जमीन निवडावीत.
५. बटाटा हे पीक थंड हवामानातील पीक आहे.
६. या पिकाची लागवड करतांना उष्ण हवामान तर पोसण्याच्या वेळी थंड हवामान पोषक ठरते.
पूर्वमशागत –
१. जमीन चांगली नांगरून घ्यावी.
२. महिनाभर जमिनीस उन्हाची ताप दिली पाहिजे.
३. त्यांनतर आडवी नांगरणी करून घ्यावी.
४. ढेकळे फोडून जमीन समपातळीवर आणावी.
५. कुळव्याच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात.
६. जमिनीत हेक्टरी चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या ५० गाड्या मिसळाव्यात.
लागवडीचा हंगाम –
१. खरीप हंगामात बटाटा पिकाची लागवड जून, जुलै महिन्यात करावी.
२. रब्बी हंगामात बटाटा पिकाची लागवड ऑक्टोबर , नोव्हेंबर महिन्यात करावी.
वाण –
१. कुफरी लवकर
२. कुफरी चंद्रमुखी
३. कुफरी सिंदुरी
४. कुफरी बादशाह
५. कुफरी कुबेरी
६. कुफरी ज्योती
७. कुफरी चमत्कार
८. अलंकार.
बियाणे –
१. बटाटा लागवडीसाठी उत्तम दर्जाच्या बियाणांची निवड करावीत.
२. हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे लागतात.
३. बियाणे लागवड करण्यापूर्वी कॅप्टन ३० ग्रॅम, बावीस्टोन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून त्यात ५ मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यांनतर लागवडीसाठी वापरावीत.
लागवड –
१. बटाटा बेण्याचे सरासरी वजन २५ ते ३० ग्रॅम असावेत.
२. लागवड करतांना २ ओळीतील अंतर ४५ ते ६० सेमी तर २ बियांमधील अंतर १५ ते २० सेमी पर्यंत ठेवावे.
३. या पिकाची लागवड ट्रॅक्टरच्या साहाय्याने सारी वरंबा पद्धतीने करावीत.
आंतरमशागत –
१. बटाटा अंतरमशागतीत सर्वात महत्वाचे काम म्हणजे तण काढणे व खुरपणी आहे.
२. साधारणतः ३ ते ४ वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
३. खताचा दुसरा हफ्ता देतांना झाडांना मातीची भर द्यावी.
उत्पादन –
१. लवकर येणाऱ्या बटाटा पिकाचे हेक्टरी २०० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
२. उशिरा येणाऱ्या पिकाचे हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
बटाट्याची बाजारात मोठ्या संख्येने मागणी असते. या पिकास भाव देखील चांगला मिळतो. या पिकाची योग्य काळजी घेतल्यास उत्पादनात वाढ होऊन उत्तम उत्पन्न मिळण्यास मदत होते.