आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कीटकनाशकांवर आता बंदी ?
सरकार शेती बरोबर मानवी आरोग्याच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असते. असाच एक मानवी आरोग्याच्या हितासाठी सरकारने दोन कीटकनाशकांवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कीटकनाशकाचा शक्यतो वापर सफरचंद तसेच टोमॅटो पिकासाठी प्रामुख्याने केला जात होता. ही दोन कीटकनाशके टेरासायक्लिन आणि स्ट्रेप्टोमायसिन आहेत. आता मात्र भारतीयांना या दोन कीटकनाशकाची विक्री करता येणार नाही. या दोन कीटकनाशकांमध्ये पिकांचा संसर्ग रोखण्याची क्षमता जरी असली तरी फवारणी नंतर मात्र नागरिकांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतांना दिसून येत होता. त्यामुळे नैसर्गिक शेतीच्या अनुशंगाने केंद्र सरकार पावले उचलत आहेत. मानवी शरीरास हानिकारक असणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात येत आहे.
हानिकारक कीटकनाशकांवरील बंदी ?
यापूर्वी देखील केंद्र सरकारने २७ धोकादायक कीटकनाशकांवर बंदी घातली होती. मात्र अजूनही या निर्णयावर अंबलबजावणी केली जात नाही. त्यामुळे या सर्व कीटकनाशकांचा आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यानंतर मानवी आरोग्यास धोकादायक वाटणाऱ्या कीटकनाशकांवर बंसि घालण्यात येत आहे. त्यामुळे या दोन कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे.
नेमके सरकारचे म्हणणे काय ?
ज्या कंपन्यांनी कच्चा माल मागवला आहे त्यांना जुना साठवलेला माल रिकामा करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे व्यापार करणाऱ्या कंपन्या ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आपल्या उत्पादनाची विक्री करू शकता. या उत्पादनावर १ फेब्रुवारी २०२२ पासून बंदी घालण्यात येणार आहे.
सरकारची दिशाभूल कशी झाली ?
सरकार आढावा घेत होता तेव्हा ही कीटकनाशके फक्त बटाटा , तांदूळ यासाठी वापरण्यात येते, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षपणे तर टोमॅटो, सफरचंद यासारख्या फळांवर या कीटकनाशक फवारणीचा वापर केला जातो. तपासणी केल्यानंतर सर्व बाबी निदर्शनास आल्या. त्यानंतर केंद्रीय कीटकनाशक मंडळाने २०२० मध्ये या कीटकनाशकांवर बंदी घालण्याची मागणी केल्या नंतर सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
बासमती तांदळावर फवारणी करणाऱ्या कीटनाशकांवर देखील बंदी घातली आहे
कीटकनाशकांचा वापर प्रमाणाबाहेर होत असेल तर त्याचा वाईट परिणाम शेती पिकावर होतो. त्याचबरोबर कीटकनाशकांमधील रसायनांचे प्रमाण देखील कमी जास्त असेल तर त्याचा अधिक वाईट परिणाम पिकांबरोबर मानवी शरीरावर देखील होतो. बासमती तांदुळासाठी वापरण्यात येणाऱ्या १२ कीटकनाशकांवर पंजाब सरकारने बंदी घातली आहे.
भविष्यात मानवी आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच कीटकनाशकांचा शेतीवर वाईट परिणाम होऊ नये यासाठी सरकारने काही कीटकनाशकांवर बंदी घातली आहे.