पशुधन

शेती बरोबर हा व्यवसाय करून मिळवू शकता लाखों रुपये

Shares

शेतकरी शेती (Farming ) बरोबर तसेच अनेक सुशिक्षित युवकांचा व्यवसायाकडील कल हा वाढत चालला आहे. आपण आज अश्या एका व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत जो शेतकरी बरोबर शेतकरी पुत्र देखील हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायातून तुम्ही बक्कळ पैसा देखील मिळवू शकतात. हा व्यवसाय म्हणजे पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming). शेती बरोबर जर तुम्ही एखादा पूरक व्यवसाय ( Business) शोधत असाल तर पोल्ट्री फार्मिंग हा अतिशय उत्तम व्यवसाय आहे. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला लाखों रुपये कमवू शकतात.

या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल तर ?
जर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल तर काळजीचे कारण नाही. कारण या व्यवसायासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. तुम्ही या योजनांचा लाभ अगदी सहज घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही लोन (Loan) देखील घेऊ शकता.

हे ही वाचा ( Read This ) या पिकाची लागवड करून मिळवा ३ लाख ३ महिन्यात, मिळणार ७५% सरकारी अनुदानही.

इन्व्हेस्टमेंट किती करावी ?
पोल्ट्री फार्मिंग साठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट (Investment) कार्याची असेल तर तुम्ही अगदी ८ ते ९ लाख रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तुम्ही जर ८ ते ९ लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर साधारणतः १५०० कोंबड्यांचा फार्म (Poultry Farm) तयार होईल. या फार्म मधून तुम्ही महिन्याला १ लाख रुपयांपर्यंत कमवू शकता. तुम्हाला जर १५०० कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल तर आपणास यापेक्षा १०% अधिक कोंबड्यांचे पिल्ले खरेदी करावे लागतील.

या व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न मिळते
तुम्ही लगातार २० आठवडे कोंबड्यांचे संगोपन केले तर तुम्हाला यासाठी साधारणतः दीड लाख रुपये खर्च येतो. २० आठवड्यानंतर कोंबडी अंडे (Egg) द्यायला सुरुवात करते. १ लेअर पॅरेण्ट बर्ड १ वर्षाला ३०० अंडी देतात. १५०९ कोंबडी पासून वर्षाला ४ लाख ३५ हजार अंडे प्राप्त करतात. यातून प्रति अंडे या प्रमाणे ४ रुपये पकडे तर तुम्ही केवळ अंडे विकून १६ लाख रुपयांची कमाई करता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *