अमृतकुंभ वनस्पती म्हणजेच गुळवेलचे आरोग्यवर्धक फायदे
जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्यातील एक म्हणजे गुळवेल. ही वनस्पती डोंगर भागात , शेतातील चिखलात सहज मिळते. या वनस्पतीमध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. आयुर्वेदात गुळवेलला अमृताचा दर्जा दिला आहे. या वनस्पतीस अमृतकुंभ म्हणून संबोधिले जाते.या वनस्पतीमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. जाणून घेऊयात अश्या गुणकारी गुळवेलचे फायदे.
गुळवेलचे फायदे –
१. जर १० ते १५ दिवसांनंतर ही ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा काढा बनवून पिल्यास ताप निघून जातो.
२. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल लाभदायी ठरते.
३. पचना संबंधित समस्या असेल तर गुळवेलचे २ दिवसातुन एकदा सेवन करावे ज्याने तुमचे पचनतंत्र सुधारेल.
४. मधुमेहावर उत्तम घरघुती उपाय म्हणून गुळवेलचा उपयोग होतो.ही वनस्पती शरीरातील इन्सुलिनची सक्रियता वाढवून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
५. डेंगू आणि मलेरिया सारख्या आजारांचे इन्फेकशन दूर करण्यासाठी गुळवेल अत्यंत प्रभावी ठरते.
६. गुळवेलमुळे दम्याच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.
७. ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.दृष्टी स्पष्टतेसाठी चालना देण्यास मदत करते.
८. दररोज गुळवेलचा काढा पिल्यास वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो.
९. मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास साहाय्य करते.
१०. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करते.
अश्या या गुळवेलचा उपयोग वेगवेगळ्या रोगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.गुळवेल ही आयुर्वेदातील अतिशय आरोग्यवर्धक अशी गुणकारी वनस्पती आहे.