युवापिढीचा आधार कृषी क्षेत्र…
नमस्कार मित्रांनो,
मी मिलिंद जि गोदे थोडं गांभीर्याने विचार करा की आजची ही शोकांतिका आहे की नव पिढीला शेती चे काही देणे घेणे नाही घरी शेती असुन सुद्धा ते दुर्लक्ष करत आहे.
आपल्याला नौकरी मधे जास्त रस आहे.त्याचे कारण की आराम देय जिवन ही पीढी रोजगारासाठी अन्य क्षेत्रांमध्ये जाण्यास प्रवृत्त होईल. या सर्व कारणांमुळे तरुणांना शेतीशी जोडण्याची कल्पना ठरेल आता आपल्या नवं तरुणांना विचार बदलावे लागेल.
शेती क्षेत्राला व्यवसाय म्हणून बघायची तयारी दाखवावी लागेल या क्षेत्रात प्रचंड शक्यता दडलेल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास तरुणांमध्ये शेतीबाबतची प्रतिमा मुळापासून बदलली जाऊ शकते. शेती मधे करण्यासाठी भरपूर आहे.सर्वप्रथम शेती क्षेत्राशी निगडित तरुणांना शेती ला अनुसरून उद्योग करावे लागेल आणि त्यांना अन्य क्षेत्रांची वाट धरावी लागणार नाही.
आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना भविष्याची शाश्वती वाटू लागेल. रोजगाराची निर्मिती करण्याचे काही अन्यही मार्ग उपलब्ध करावे लागतील.
कृषितंत्र च सुधारेल असे नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च पदांवर सेवा करण्याचे स्वप्न साकार करता येईलआपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील हे निश्चित पण सुरवात करणं हे महत्त्वाचे आहे.
आपल्याला नौकरी नाही मालक बनायचं आहे.मित्रांनो शेतीला चांगले दिवस आणायचे असेल तर शेती ला व्यवसाय म्हणून बघावे लागेल. वैयक्तिक विकासाबरोबर संपूर्ण गावाचा व गावाबरोबर परिसराचा विकास करण्याची ताकद आपण निर्माण करू शकतो. आताच्या काळात शेती कडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे.
ज्याप्रमाणे सरकारने मेक इन इंडियामार्फत उद्योगक्षेत्रांना व्यवसाय करण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातय तेच भाग्य शेतकऱ्याच्या नशिबी यायला हवं. ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम मुख्यतः लघु उद्योगांसाठी आहे.
हा उपक्रम प्राथमिक क्षेत्रासाठीही असावा. कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि इथे औद्योगिक आणि सेवा क्षेत्राच्या मानाने कृषी क्षेत्र कमकुवत आहे. त्यामुळे आपल्याला हे क्षेत्र मजबूत करण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. सुधारित तंत्रज्ञान, सुधारित पद्धती इ. गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.गावात असणारा तरुण वर्ग शेती ची व मातिची जोपासना करेलच यांत शंका नाहीं.मित्रानो आता तुम्ही म्हणाल नवं तरुणच का ?
शेती क्षेत्रात आता पूर्वीइतके मेहनतीचे काम राहिले नसून अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांचा अंतर्भाव झाल्याने, तरुण या क्षेत्राकडे वळून योग्य माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:ची प्रगती करू शकतात, आणि स्वत:ला आणि शेती कामाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात.
तसेच अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत तरुण होतकरू पिढी या शेत्रात उतरून शेतीचे उत्पादन वाढवण्याची आता आवश्यकता आहे.जर हे चित्र बदलल्यास आपला शेती क्षेत्रात आपन देशात नावारूपाला येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांकडे तो जोश आणि ताकद नक्कीच आहे. तिचा वापर कसा करून घ्यायचा, हे आपण ठरवायचे आहे.
तसं पाहिलं तर युवाशक्ती मोठ्या प्रमाणात असलेला सध्या भारत एकमेव देश आहे आणि म्हणूनच माझ्या मते सध्याची तरुण पिढी उच्च शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भारत खऱ्या अर्थाने बलशाली होऊ शकेल.
धन्यवाद मित्रांनो.
Mission agriculture soil information
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
मिलिंद जि गोदे