आले (अद्रक ) पिकावरील रोग व त्यावर उपाययोजना
मसाला पिकामध्ये स्वादासाठी महत्वाचे पीक म्हणजे आले. आल्यामध्ये काही औषधी गुणधर्म दडलेले आहेत .त्यामुळे त्याचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. आले पिकांवरील रोगांचे नियंत्रण वेळीच केले पाहिजे. अन्यथा उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्त असते.
रोग व त्यावर उपाययोजना –
नरम कूज –
१. पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर नरम कूज रोगाचा प्रादुर्भाव होतो.
२. या रोगामध्ये झाड शेंड्याकडून वाळत जाते.
३. बुंधायचा भाग सडल्यामुळे सहजपणे उपटला जातो.
४. हळूहळू जमिनीतुन गड्डे सडण्यास सुरुवात होते.
उपाययोजना –
१. रोगट झाडे दिसल्यास मुळांसोबत उपटून नष्ट करावीत.
२. पिकांवर लागवडीपूर्वी व लागवडीनंतर दर महिन्याला बोर्डोमिश्रण फवारावेत.
३. आले पीक सतत लागोपाठ न घेता त्यांची फेरपालटणी करावी.
४. पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन निवडावीत.
करपा (पानावरील ठिपके ) –
१. करपा रोग सुरवातीला कोवळ्या पानांवर होऊन नंतर संपूर्ण पानांवर पसरतो.
२. पानांवर असंख्य भुरकट ठिपके तयार होऊन पाने गळू लागतात.
उपाययोजना –
१. बोर्डो मिश्रण १ % तयार करून त्याची फवारणी करावी.
२. हवामानाचा अंदाज घेऊन ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात साधारणता १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कंदकूज (गड्डे कुजव्या ) –
१. जुलै ते सप्टेंबर च्या कालावधीत हा रोग जास्त प्रमाणात दिसतो.
२. सुरुवातीला पानांचे कडे , शेंडे पिवळे पडण्यास सुरुवात होते. नंतर खालीपर्यंत ते वाळत जाते.
३. खोडाच्या जमिनीलगतचा भाग काळा पडून निस्तेज झालेला दिसतो.
४. खुरपणी व आंतरमशागत करतांना कंदास इजा झाली तर त्यातून पिथियम , फ्युजेरियम यांसारखे बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होतो मग कंद
कुजण्यास सुरुवात होते.
उपाययोजना –
१. लागवड करतांना निरोगी बियाणांचा वापर करावा.
२. उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम जमीन निवडावी.
३. पावसाळ्यात पाण्याचा निचरा चर घेऊन करावा.
४. हा रोग आढळून आल्यास शेतामध्ये बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
५. लागवड करतांना २ किलो ट्रायकोडर्मा प्रति एकरी शेणखतातून द्यावे.
आले पिकाची लागवड करतांनाच चांगली निचरा होणारी जमीन निवडावीत. आले पिकांवर कोणत्याही रोगाचे लक्षणे आढळ्यास त्वरित त्यावर उपाययोजना करावीत.
ReplyForward |