शेतकऱ्यांसाठी थोडं महत्वाचं ! एकदा वाचाच
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आपल्या शेतातल्या मातीची सुपिकता कमी होत आहे यांचे कारण म्हणजे आपल्या वरचा सुपीक थर जोरदार झालेल्या पावसाळ्यामुळे आणि त्याच बरोबर जमिनीची होणारी धूप या मुळे जमिनीची सुपीकता कमी होते.जमिनीची सुपीकता तयार व्हायला वर्षे लागतात.पण तयार झालेला सुपिक थर वाहून जायला एखादा जोरदार पाऊस पुरेसा असतो.निसर्गाने दान दिलेला सुपीक थर हा आपल्या निष्काळजीपणा मुळे मातीच्या रूपाने वाहून जाऊ शकतो.आपल्याला वाटतं की मातीची धूप होऊ नये यासाठी शेती मधे उपाय व नियोजन महत्त्वाचे आहे.आपल्या शेतातल्या मातीचा सुपीकता कमी होण्याचे आणखी कारण तेच ते पिकं एकाच पद्धतीने घेणे.
आपण पीक घेतो तेव्हा ते पीक मातीच्या मधला कर्ब ओढून घेत असतो.तो कर्ब म्हणजेच पोषकद्रव तो शोषून आपले पीक तयार होत असते.आपले चुकतंय कोठे!आपण वारंवार पिके घेतो परंतु त्या पिकांच्या रुपाने शोषून घेतलेल्या पोषक द्रव्यांची मोबदल्यात आपन धरती ला वापस काहीच देतं नाही.असा मोबदला न देता आपन पिके घेतली की, जमिनीची सुपीकता कमी होते.ते सुपिकता कमी झाले तर शेती मधील उत्पादन खर्च ही निघत नाही.मग पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो.रासायनिक खते म्हणजे अपुरे जेवन! विरघळतात आणि समाप्त होतात जातात.पीक उत्पादन तर येते पण जमिनीला त्या खतांचा उपयोगच होत नाही.
थोड समजून घेऊ शेणखत,कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत अशी खते शेतात टाकली की पिकांना पोषक अन्नद्रव्ये मिळतात कारण या मधे कर्ब वाढविण्यास मदत होते आणि जमिनीच्या सुपिकतेची भरती करण्यात सुरवात होते.कारण ही सर्व खतामधली पोषक द्रव्ये संपली की, मातीचे रूप धारण करून मातीची घनता वाढविण्यासाठी मदत होते.म्हणजे या सेंद्रीय खतांनी जमिनीचा कस सुद्धा वाढत असतो.सेंद्रीय खतांचा हा वेगळा उपयोग जो या रासायनिक खतांनी साध्य होत नाही. उदा०आपन गाय ला दुधादेण्या साठी तयार करायचे असते.पण तीला खाण्यासाठी काहीच नसेल आणि मुळात तिचे शरीर बळकट नसेल तिच्या अंगात दूध देण्याची क्षमता नसेल तर तिला दूध देण्याच्ं हार्मोन्स दिले जाते त्या गोष्टी ची तात्पुरती तयारी केली जाते.तसे मातीचे झालेआहे आपल्या शेताची सुपीकता कमी होत आहे तरी आपण रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतो.
ज्या माती मध्ये पोत चांगला असला तरी पावसाच्या विलंब अवस्थेत ओल टिकून ठेवण्याची क्षमता असते.त्या जमिनीवर पिके लवकर सुकत नाहीत पण,चुनखडी कींवा रेताड असलेल्या जमिनीत मात्र आठ दहा दिवस जरी पावसाचा खंड पडला कि लगेच पिके माना सुकण्यास सुरवात होते.त्याचे कारण की त्या जमिनीत दुष्काळासी लढण्याची शक्ती नसते.या दहा बारा वर्षामधे पावसाळ्याचे वेळापत्रक बदलले आहे. वारंवार दुष्काळ सदृश परिस्थिती असे आपल्याला जाणवते.जर आपल्याला मातीचा दर्जा किंवा पोत सुधारला पाहिजे असे वाटत असेल तर त्यासाठी जमिनींना सुपीक व कर्ब वाढविणारे खते वापरली पाहिजेत….धन्यवाद मित्रांनोविचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल.
Mission agriculture soil information
Milind j gode9423361185