आज मातीला वाचवा उद्या माती आपल्याला वाचवनारच – एकदा वाचाच
नमस्कार मंडळी आपन विचार करा की माती ही कीती पिकं घेतल्यानंतर पिकांचे उरलेले अवशेष जाळून टाकण्याची प्रथा आपल्याकडे अनेक भागांत आहे, मात्र त्यामुळे माती मरते, क्षीण होते. मातीच्या याच वरच्या थरांत अत्यंत पोषक असे सेंद्रिय घटक असतात. या सेंद्रिय घटकांचं मातीतलं प्रमाण किमान दोन टक्के तरी असलं पाहिजे. पण अयोग्य पारंपरिक कृषी सवयींमुळे आपल्याकडे अनेक ठिकाणी मातीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण जवळपास 0.1 टक्क्यापर्यंत घसरलं आहे. अशा मातीत पिकं कशी जोम धरणार? आपण शेती आणि मातीला इतकं ओरबाडून घेतो, की माती, जमिनीसाठी काही शिल्लकच ठेवत नाही.
एक पाऊल विषमुक्त अन्नाकडे
इतकं की शेणखतांचा वापरही आपल्याकडे आता नगण्य झाला आहे. जनावरांचं शेणही आपण मातीला मिळू देत नाही. पिकांचे किमान उरलेले अवशेष जाळून न टाकता ते मातीलाच परत केले तर मातीतील सत्त्व टिकून राहील.‘जगा आणि जगू द्या’ हा जसा विश्वाचा नियम आहे, तसाच मातीच्या आरोग्य व्यवस्थापनचाही ‘लॉ ऑफ रिटर्न्स’ हा एक नियम आहे. जे घेतलं, त्यातलं किमान काही परत करा. माती म्हणजे तुमचं जणू बॅँक अकाउण्ट आहे. त्यात जेवढी रक्कम आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही काढू शकत नाही ! आपल्या अकाउण्टमध्ये ठणठणपाळ होणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल..डॉ. रतन लाल म्हणतात, माणसाचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य यांत काहीच फरक नाही.
शेतीतील उत्पादन वाढवायचे आहे, मग हे नक्की कराच…
आपण आपल्या शरीर-मनाकडून कामं करवून घेतो; पण त्यासाठी त्याच्या भरणपोषणाचीही तितकीच आवश्यकता असते. आपण मातीतून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक सेंद्रिय पदार्थ काढून घेतो; पण त्यातले मातीला किती परत करतो?मातीत जास्त खत घातलं म्हणजे जास्त पीक येईल, या भ्रामक कल्पनेतून आपण शेतात आंधळेपणानं इतकं खत घालतो, की त्यामुळे मातीची अक्षरश: वाट लागते. भात शेतीत तर अनेकदा उभ्या पाण्यात खत घालतात. तापमान जास्त असताना अनेकदा ही खतं हवेत मिसळल्यानं वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगला हातभार लागतो. ही खतं पाण्यावाटे जमिनीच्या आतही झिरपतात. त्याचा मानवी शरीरावरही दुष्परिणाम होतो.जमिनीचा वरचा थर निसर्गानं अक्षरश: लाखो वर्षांत तयार केलेला असतो; आहे.माती ही एक जिवंत संस्था आहे महत्वाचं म्हणजे ती सजीव आहे.
माती ही आपल्या जमिनीवर राहाणार्या सजीवाचा मूलाधार आहे. पृथ्वी तळावरील प्रत्येक सजीव मातीवरच अवलंबून आहे. आपल्याला येवढं ही माहीत असूनही मातीची किंमत आपल्याला अजून कळलेली नाहीच.प्रत्येक सजीवाला काही ना काही अधिकार दिलेलाअसतो. त्यानुसार मातीलाही काही अधिकार आहेत. जोपर्यंत आपण अन्न, पाणी आणि इतर नैसर्गिक स्त्रोत मातीच्या माध्यमातून वापरतो आहोत, तोपर्यंत मातीलाही आपलं काही देणं लागतच. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जे जेवढं, जसं शक्य होईल ते मातीला परत केलं पाहिजे आणि तिच्या उपकाराची परतफेड केला पाहिजे.माती ही आपल्या जिवाभावाची केवळ सोबतीच नाही तर आपल्याला जगवणारी जिवनदायनी आहे, हाच दृष्टिकोन आपल्याला बाळगायला हवा त्यातूनच मातीवर प्रेम निर्माण होईल.या मातीतून लोकांना जगण्याला आधारही मिळलं!आपन देणार्याचे उपकार मानतच नाही उलट त्यांच्या मधे कमी काढतो.
श्रीलंका या देशाच सेंद्रिय शेतीमुळे वाटोळं झालं ? भविष्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती ही खरच काळाची गरज असणार आहे का ?
आता हेच बघा की आपलं चुकतंय कोठे आपन पिकं घेतल्यानंतर पिकांचे उरलेले अवशेष जाळून टाकण्याची प्रथा आपन निर्माण केली.आपल्याकडे शेतकरी अनेक भागांत असे अवशेष जाळतात त्या मुळे मात्र आपल्या त्यामुळे माती मधील जिव मरण पावतात किंवा क्षीण होतात.आपल्या मातीच्या याच वरच्या थरांत अत्यंत पोषक असे सेंद्रिय घटक व करोडो जिव जिवाणू असतात.या सेंद्रिय घटकांचं मातीतलं प्रमाण किमान दोन टक्के तरी असलं पाहिजे. पण काही काही अयोग्य पारंपरिक कृषी सवयींमुळे आपल्याकडे अनेक ठिकाणी मातीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण जवळपास 0.1 टक्क्यापर्यंत घसरलं आहे.हि एक चिंतेची बाब आहे.अशा मातीत पिकं कशी जोम धरणार?
हाच एक यक्षप्रश्न आहे.आपण काय केले की शेती आणि मातीला इतकं ओरबाडून घेतो, की जमिनीसाठी काही शिल्लकच ठेवलें नाहीत इतकं की शेणखतांचा वापरही आपल्याकडे आता नसल्या समानच आहे. हे काय जनावरांचं शेणही आपण मातीला मिळू देत नाही. परंतु पिकांचे उरलेले अवशेष जाळून न टाकता ते मातीलाच परत केले तर मातीचे सत्त्व टिकून राहील.तसाच मातीच्या आरोग्य व्यवस्थापनाचा एक नियम आहे.जे घेतलं त्यातलं काही परत करा. माती म्हणजे तुमचं जणू एक प्रकारची बॅक आहे की त्यात जेवढी रक्कम आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही काढू शकत नाही ! आपलं कर्बरुपी खाते पुस्तिका खाली होणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माणसाचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य यांत काहीच फरक नाही.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देते 10 लाखांचे कर्ज, विना गॅरंटी, जाणून घ्या अर्ज कसा करावा
आपण आपल्या शरीर व मनाकडून कामं करवून घेतो; पण त्यासाठी त्याच्या पोषणाची ही तेवढिच आवश्यकता असते. आपण मातीतून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक सेंद्रिय घटक काढून घेतो पण त्यातले मातीला किती परत करतो?मातीत जास्त खत घातलं म्हणजे जास्त पीक येईल, या भ्रामक कल्पनामधुनआपण शेतात आंधळेपणानं इतकं खत घालतो, की त्यामुळे मातीची अक्षरश: वाट लागली. शेतात तापमान जास्त असताना अनेकदा ही खतं हवेत मिसळल्यानं हवा प्रदूषित होऊन ग्लोबल वार्मिंगला हातभार लागतो. ही खतं पाण्यावाटे जमिनीच्या आतही झिरपतात. त्याचा मानवी शरीरावरही दुष्परिणाम होतो.जमिनीचा वरचा थर निसर्गानं अक्षरशा लाखो वर्षांत तयार केलेला असतो पण त्या गोष्टीची जाण आपल्याला नाही.
खरच आपन अधोगतीच्या मार्गावर आहे या सर्व गोष्टी मुळे विनाश अटळ आहे …..
धन्यवाद
save the soil all together
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com