शेतामधली माती म्हातारी झाली आहे का? एकदा वाचाच
नमस्कार मंडळी
थोडं वाचुन मनात विचारांचे प्रचंड वादळ सुरु झाले असेल ना तर मनावर ताबा ठेवा व मि लिहिलेलं एकदा वाचा व अभिप्राय नक्की कळवा. मित्रांनो आपन शेतकरी आहोत तो रासायनिक शेती करणारा असो जैविक शेतकरी असो सेंद्रिय शेतकरी असो की नैसर्गिक शेती करणारा असो मला सर्वांना हेच सांगायचे आहे.आपन फक्त माती मधुन उत्पादन घेतो मनात आले तसे करतो.मातीच्या सुपीकतेची वाट लावली आहे पण जमिनीला तिळमात्र ही आपन देत नाही. आपला शेतकरी वर्ग शेणखत देतो ते ही बुरशी ने माखलेले त्या विशेष म्हणजे काही शेतकरी कंपोस्ट खत तयार करतात मग जमिनीत देतात हे कीती योग्य आहे मला समजलेच नाही. कुजलेल खत कश्या साठी द्यावे का नाही द्यावे हे मि समजून सांगतो .
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?
मित्रांनो आपल्याला आपल्या मातीवर विश्वास नाही का? ति म्हातारी झाली की काय?शेती मधे टाकलेल कुजलेले खत यांचे परीणाम काही दिवसापुरते मर्यादित असतात आपण तिच्याकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघतो.कुजलेलं खत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्या सारखें आहे.मला तर कधीं कधीं तर वाईट वाटते की हे काय चालु आहे.जेवढे डोक्यावर केस नाही तेवढ्या कुजवण्याच्या पद्धती आहे.शेती मधे जो आला तो ज्ञान वाटुन निघून जातो.शेतकर्याची परीस्थिती जैसे थे! शेतकरी हा पाचीला पुजल्या सारखा आहे.काहींना वाटते शेतकरी यांना काहीच समजत नाही.ही एक शोकांतिका आहे.जैविक शेती करा हे सर्वच म्हणतात.हे वाटतं तेवढं सोपं नाही.
हे ही वाचा (Read This जनावरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे? एकदा वाचाच
आपल्याला प्रथम शेती सुपिक राहील या पद्धतीने शेती करायची आहे.फक्त खत कुजवून शेती नसते होत.त्यासाठी शेती बद्दल सकारात्मक विचार ठेवावे लागते.मधामधात शेतकरी कंपोस्ट च्या मागे लागले होते जणू काही एकाच दिवसात शेतीचा कर्ब वाढवतात कि काय असे वाटत होते.मला कंपोस्ट खत यावर विश्वास नाहीच! सांगण्याचे तात्पर्य असे की आपन जमिनीत कुजलेले खत टाकतो.आपल्या ते जमिनीत कोणते कार्य करते व किती दिवस पर्यंत कार्य चालू राहते हे ही माहित नाही.आपन जमिनीला आजच म्हातारं केले आहे.जसे म्हातारी माणसाला बारीक करून द्यावे लागते तसे आपन माती सोबत करत आहे विषय समजून घ्या आपन शेताच्या बाहेर शेणखत कंपोस्ट का करतो?काही शेतकरी दुसर्याच्या सांगण्यावरून म्हणतात की कंपोस्ट मधे जिवाणू प्रमाणात भरपुर असतात बस एवढेच त्यांना माहीत असते.आपन फक्त कानाने ऐकून गुरू करतो.
हे ही वाचा (Read This) पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा
तथ्य जाणुनच घेत नाही.आपल्या माती कोणते कुजवावे व कोणते नाही कुजवावे हे सर्व समजतं,नाहीतर आपन जे बियाणे पेरणी करतो ते मातीत कुजले नसते का ! मला हेच सांगायचे आहे की ते माती एक जिवंत परीसंस्था आहे ती असंख्य मुलद्रव्याच माहेर आहे.ती इतकी ताकदवान आहे की निर्जिव असलेलं सर्वच कुजवतेमला सांगा की माती मधे जिवाणू आहे मग शेती घ्या बाहेर कुजवण्याला अर्थ काय?
धन्यवाद मित्रांनो
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
मिलिंद जि गोदे
9423361185milindgode111@gmail.com
Save the soil all together
हेही वाचा :- विवाहितेची ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या