ब्लॉग

कडूलिंब: आपल्या संस्कृतींची ओळख, एकदा वाचाच

Shares

नमस्कार मित्रांनो,

आपली संस्कृती महान आहे मानवतेच्या दृष्टीने असो की पर्यावरणाच्या!आपन निसर्ग पुजक त्याच बरोबर निसर्गाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो त्याच निसर्गाने शेती साठी दिलेली देणं म्हणजे कडूलिंब. आपल्या संस्कृतीत कडुलिंबाचे फार मोठे योगदान आहे.

राजस्थान मध्ये कडुनिंबाच्या झाडांची पुजा करतात व त्या झाडाचे लाकूड सुद्धा कापत नाही. महत्वाचं म्हणजे कडूिंलबाचे झाड हे नेहमी प्राणवायू वातावरणात सोडत असते.त्याचप्रमाणे मानवाच्या दृष्टीने वातावरणातील घातक असा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतो.

हे ही वाचा (Read This) खतातील बनावटपणा कसा ओळखावा ?

आपले पुर्वज रात्री झाडा खाली कधीच झोपत नसतं त्या मागिल हेच कारण असु शकते. त्या मधे फायद्याची बाब म्हणजे या झाडामुळे धूळ व धूर दोन्हीही अडविले जातात. हे एकमेव झाड आहे कि निसर्ग चक्राच्या विपरीत चालते हीवाळ्यात या झाडाचे पाने गळुन पडतात व उन्हाळ्यात सदैव हिरवेगार राहात असल्यामुळे आपणास नियमित घनदाट व शीतल अशी सावली मिळत असते.बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे शेती क्षेत्रात म्हणा किंवा शेतकरी हीताचे म्हणा या झाडाला महत्त्व प्राप्त झाले आहे. निंबोळी किंवा पानांचा रस असो की अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड,रोग व जिवाणु नियंत्रक आहे.निंबोळी अर्क व निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

या बहुउपयोगी झाडाचा व त्यामधील घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच निंबोळी व तेलाचा कींवा पावडर चां सूत्रकृमी नियंत्रक म्हणून देखील उपयोग करता येतो. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. कडूनिंब झाडांची पानांमध्ये व बियांमध्ये काही बहुउपयोगी घटक आढळून येतात.
जसे ॲझेटार्क्टिन हा घटक परिणामकारक असून हा घटक किडींना जवळ न येऊ देता त्यांचेमध्ये कायमचअपंगत्व आणून त्यांना संपुष्टात आणण्याचे काम करत असते असतो.हा घटक पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. किडींचा जीवनक्रम संपविण्यासाठी हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.त्याच बरोबर निंम्बीन विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी हा घटक उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा (Read This) पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे

पिकांवरील तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो.त्यामध्ये सालान्नीन हा घटक पिकांवरील पाने खाणार्‍या किडींवर प्रभाविपणे कार्य करतो. तसेच घरातील माश्या, भुंगे, खवले यावरसुद्धा प्रभावीपणे कार्य करतो.


एकंदरीत कडूिंलबाच्या पानांपेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक अधिक तीव्र आहे.नियंत्रित होणारे कीटक मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी,पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी महत्वाचं म्हणजे धान्य साठवणुकीतील किडे, मेंढ्यावरील माश्या कर्दनकाळ आहे.

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

या सर्व किडींचासुद्धा प्रादुर्भाव कमी करणसाठी बहुमूल्य अशा या घटकांचा उपयोग होतो. विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी उपयुक्त असल्याकारणाने या घटकाला या कारणांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.पिकांवरील किडी तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती या घटकांमध्ये आढळते.

हे ही वाचा (Read This) BLACK SOIL: कोणत्या पिकासाठी काळी माती आहे सर्वोत्तम, जाणून घ्या काळ्या मातीची वैशिष्ट्ये

कडूलिंबाच्या अर्काद्वारे किडींच्या नियंत्रण कडूनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध रोधक, किडीस खाद्यप्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करते. तर बहुगुणी वनौषधी म्हणून सुद्धा आयुर्वेदिक मधे महत्वाचं आहे.
धन्यवाद मित्रांनो.

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
Save the soil all together

मिलिंद जि गोदे
9423361185
milindgode111
@raajkisan

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *