इतर बातम्या

कापूस बियाणे दरात वाढ, शेतकऱ्यांना झळ

Shares

दिवेसंदिवस सर्वच गोष्टींच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. आता ही वाढती महागाई कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भारी जाणार आहे. याचे कारण म्हणजे कापूस बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

पूर्वी कापूस बियाण्याचे एक पाकीट ७३० रुपयांना मिळत होते. आता या दरामध्ये वाढ होऊन एक पाकीट हे ८१० रुपयांना मिळत आहे. प्रति एकरी कापूस लागवड कारण्यासाठी २ पाकीट लागत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना १६० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे.

हे ही वाचा (Read This) रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात भारतीय गव्हाची चमक वाढली, कोणत्या देशात किती निर्यात झाली?

मागील काही वर्षांपासून कापूस लागवड क्षेत्रात वाढ होतांना दिसून येत आहे. तर कापसाला यंदा विक्रमी दर मिळाल्यामुळे शेतकरयांचा कापूस लागवडीकडे अधिक कल निर्माण होत आहे. त्यात बोंडअळीमुळे उत्पादन कमी झाले असले तरी भाव चांगला मिळाल्याने हे नुकसान भरून निघण्यास मदत झाली.

पूर्वहंगामी कपाशी लागवडीकडे दरवर्षी शेतकऱ्यांचा कल असतो. यावर्षीदेखील त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सिंचनाची उत्तम व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत अनुदानात सुधारणा करण्याच्या तयारीत

कापूस बीज मूल्य नियंत्रण विभागाने काढले राजपत्र

केंद्र सरकारच्या कापूस बीज मूल्य नियंत्रण विभागाने नुकतेच एक राजपत्र काढले आहे.त्यामध्ये कापूस बियाण्यांची जास्तीत जास्त किंमत निर्धारित करण्यात आली असून त्यानुसार पूर्वी ४५० ग्रॅमसाठी आकारले जाणारे ७३० रुपयांऐवजी आता ८१० रुपये मूल्य द्यावे लागणार आहे. ४५० ग्रॅमच्या दोन पाकिटांमध्ये एक एकर लागवड केली जाते. त्यामुळे आता शेतकऱ्याला एका बॅगमागे ८० प्रमाणे दोन बॅगसाठी १६० रुपये आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

हे ही वाचा (Read This) पोल्ट्री उद्योग अडचणीत, उत्पानांपेक्षा खर्च जास्त तर अंडयांच्या दरात घसरण

दरवर्षी कपाशीच्या ५० ते ६० प्रकारच्या कापूस बियाणांची चांगली विक्री होते. गेल्यावर्षी चांगला भाव मिळाल्याने यंदाही कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. चांगले उत्पन्न देणाऱ्या कापूस बियाणांना शेतकऱ्यांकडून मागणी असते. कपाशीचे भाव वाढल्याने बियाणे महागले असावे, असा अंदाज कृषी केंद्र संचालकांनी व्यक्त केला आहे.

हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *