यंदा कापसाला मिळालेल्या दरामुळे सोयाबीनचा पेरा घटणार
गेल्या ४ वर्षांपासून खरिपातील सोयाबीन पेरणी क्षेत्र घटताना दिसत आहे. यंदा कृषी विभागाने ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी नियोजन केले आहे. मात्र ८९ हजार ते ९० हजार हेक्टर पर्यंतच सोयाबीनची पेरणी होईल अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा (Read This) शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान
जिल्हा कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी ४ लाख ८३ हजार ३०० हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन केले आहे. यात कपाशीचे पीक आघाडीवर असून, धानाचे पीक दुसऱ्या, सोयाबीन तिसऱ्या तर तुरीचे पीक चौथ्या स्थानावर आहे.
शेतकऱ्यांची कापूस पिकास पसंती
उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असून नरखेड, काटोल, कळमेश्वर या तालुक्यामध्ये सोयाबीन क्षेत्र घटले आहे. तर रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच बाजारामध्ये मिळणार कमी वा सरासरी दर पहिला तर सोयाबीनचे पीक घेणे हे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक न घेण्याचे ठरवले आहे. अशी माहिती काटोल, सावनेर, नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून मिळवा १० वर्षापर्यंत भरघोस नफा
गेल्या २ वर्षात सोयाबीन लागवड क्षेत्र ९ हजार ६१७ हेक्टरने घटले
जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात १,०२,३८७ हेक्टरमध्ये तर सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात ९२.७७० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. या दोन वर्षात जिल्ह्यातील सोयाबीन पेरणी क्षेत्र ९,६१७ हेक्टरने घटले. यंदा कृषी विभागाने ९३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी नियोजन केले आहे. मात्र ८९ हजार ते ९० हजार हेक्टर पर्यंतच सोयाबीनची पेरणी होईल अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा (Read This) खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही, उन्हाळी सोयाबीन बहरले !
बियाण्यांसाठी उन्हाळी सोयाबीनहा वापर
यंदा नागपूर जिल्ह्यामध्ये १ हजार ३ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. तर उन्हाळी सोयाबीनचे प्रति एकर प्रमाणे २ ते ४ क्विंटल उत्पादन झाले आहे. या बियाणांचा वापर हा खरीप हंगामातील बियाण्यांसाठी केला जाणार आहे. अशी माहिती सोयाबीन उत्पादकांनी दिली आहे.
हे ही वाचा (Read This) भारतीय गव्हाला जगात वाढली मागणी, एकूण 1 दशलक्ष टन गहू निर्यात, गव्हाला अजून चांगला दर मिळणार ?
सोयाबीन आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे कपाशीची लागवड
अनेक प्रयत्न करून देखील सोयाबीनवरील रोग व किडीचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे सोयाबीन पिकांवर रोटाव्हेटर फिरवावे लागले आहे. तर रोग व किडींमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे व सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी कपाशी लागवडीकडे जास्त लक्ष देत आहेत.
कृषी विभागाची जोरदार तयारी सुरु
कृषी विभाग आता बियाण्यांसह खतांची तरविज करण्याच्या मार्गावर लागले आहे. जिल्हा कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी ४ लाख ८३ हजार ३०० हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन केले आहे. यात कपाशीचे पीक आघाडीवर असून, धानाचे पीक दुसऱ्या, सोयाबीन तिसऱ्या तर तुरीचे पीक चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा :- किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल