FACT CHECK PM KISAN ट्रॅक्टर योजना, शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर मिळणार का ?
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
अशीच एक पीएम किसान योजना सरकारकडून राबवली जात असून त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. तर अश्याच एका पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची बातमी सोशल मीडिया वर सगळीकडे दाखवली जात आहे. मात्र सत्य काही वेगळेच आहे. शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर मिळणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये
नेमकं सत्य काय आहे ?
पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि विविध यंत्रसामग्रीवर भरघोस सबसिडी दिली जात आहे तर शासन यासाठी ५ लाख रुपयांची सबसिडी देत आहे ही बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना सरकारने राबवलेली नाही असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांनी संपूर्ण शहनिशा करून स्पष्टता दिली आहे.
तसेच ट्विटर द्वारे पीआयबी फॅक्ट चेकने याचा तपशील दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अश्या कोणत्याही बातम्यांच्या बळी न जाता संपूर्ण शहानिशा करावी.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड