शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५०% ते ८०% टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार
महागाई मुळे सर्व क्षेत्र पोळून निघत असून याचा चटका शेती व्यवसायाला देखील बसत आहे. शेतात उपयोगाला येणारी प्रत्येक गोष्ट महागली असून शेती अवजार देखील महाग झाल्याचे पाहायला मिळते. अनेक छोट्या शेतकर्यांना आधुनिक अवजार विकत घेणे शक्य होत नसल्याने, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘स्माम’ योजना आणली आहे, या योजने अंतर्गत ५० ते ८० टक्के सुट अवजार खरेदीवर शेतकर्यांना मिळणार असून, यासाठी फक्त शेतीचा सातबारा आणि अन्य काही कागद पत्रे आवश्यक आहे.
हे ही वाचा (Read This पिकं वाढीसाठी मुलद्रव्य ची ओळख – एकदा वाचाच
कशी करावी नोंदणी
‘स्मम’ योजने बद्दल बहुतांश शेतकर्यांना माहित नाही यासाठी आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, राह्वासी प्रमाण पत्र आणि नमुना ८ तसेच मोबाईल क्रमांक आवश्यक असेल. या योजनेचा लाभ घेण्यासठी https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागणार आहे. याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी हा पर्याय निवडावा लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.
हे ही वाचा (Read This ) कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न
या पेजवर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये तुमचे नाव, आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. अखेर Submit यावर क्लिक केल्यावर तुमची नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण होईल.
हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच
भारत सरकारने का आणली ‘स्माम’ योजना
मुळात भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, भारताच्या जडणघडणीत कृषी क्षेत्राचा मोठा वाट आहे, तरीही अध्याप म्हणावे तसे कृषी क्षेत्राचा विकास झालेला नाही. तसेच आधुनिक यंत्राची देखील शेतकऱ्यांना ओळख झालेली नाही. जर आधुनिक अवजारे शेतात वापरले गेले तर शेतीचे उत्पादन वाढेल आणि कृषी क्षेत्राचा अधिक विकास होईल म्हणून केंद्र सरकाने हि योजना आणली. या योजनेतून शेतीचे आधुनिक आणि पारंपारी दोन्ही प्रकरचे अवजारे शेतकरी विकत घेऊ शकतो.
हे ही वाचा (Read Thisदुग्धव्यवसायाशी निगडित शेतकऱ्यांसाठी, अनेक वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध