सोयाबीनच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोयाबीनचे दर हे चढ उतारीनंतर आता स्थिरावले आहेत. गेल्या कित्तेक दिवसापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून ठेवला आहे. मात्र आता शेतकऱ्यांना वेळीच निर्णय घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार तर कधी स्थिरता असे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This ) उन्हाळी सोयाबीनला शेंगा लागत नाहीये, दोष कोणाचा?
मध्यंतरी सोयाबीनचे दर हे ७ हजार २०० वर स्थिर होते. त्यांनतर दरामध्ये ५० ते १०० रुपयांची वाढ होत गेली आणि आता हे दर ७ हजार ३५० वर स्थिरावले आहे.
सोयाबीनचे आजचे दर
हे ही वाचा (Read This ) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता येणार १५ एप्रिलला ?
सोयाबीनच्या वाढत्या उतरत्या दरामुळे शेतकरी आता काय निर्णय घेणार ?
सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दराची चर्चा सर्वत्र होत आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्यास अगदी कवडीमोलाचा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरामध्ये वाढ झाल्यानंतर अधिक दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवूनकीवर भर दिला.
आता मात्र सोयाबीनला काहीसा मुबलक प्रमाणात दर मिळत असला तरी पुढे हा दर वाढेल की कमी होईल हे सांगता येत नाही. दरात घसरण झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी संयमाने निर्णय घेणे गरजेचे आहे.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड
उन्हाळी सोयाबीन पिकांना शेंगाचा आल्या नाहीत
नैसर्गिक संकटांमुळे खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र त्यास मुबलक प्रमाणात फुले तसेच शेंगा आलेल्या नाहीत. अगदीच काही मोजक्याच शेंगा आल्या असल्या तरी त्यातील अनेक शेंगा तर आतून पोकळ आहेत.