उन्हाळी सोयाबीनला शेंगा लागत नाहीये, दोष कोणाचा?

Shares

खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची लागवड करून थोड्या प्रमाणात का होईना पैसे पदरी पडतील या अपेक्षेने सोयाबीनची लागवड केली होती.
मात्र चित्र पूर्ण वेगळे दिसत आहे. आता फुलांचा तसेच शेंगांचा कालावधी संपत आला तरीही सोयाबीनच्या रोपांना शेंगाचा आलेल्या नाहीत. कंपनीने सदोष बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

महाबीज बीज प्रक्रिया केंद्र आष्टा या कंपनीने शेतकरी मेळावे गावोगावी आयोजित केले होते. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. तर त्याबरोबर बाजारभावापेक्षा अधिक २५ % दराने सोयाबीन खरेदी करणार अशी हमी दिली होती. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टोकण पद्धतीने जवळजवळ शंभर एकरात लागवड झाली.

कंपनीने एक छापील वेळापत्रक दिले त्यामध्ये खते, औषधांची मात्रा दिलेली होती. सर्व पाहता ४० ते ४५ दिवसात फुलकळी येणे अपेक्षित होते. परंतु तसे न घडता अगदीच कमी प्रमाणात फुलकळ्या आल्या असून ७० ते ८० दिवसानंतर या फुलकळ्या लागल्या.

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

फुलकळ्या लागल्याअसल्या तरी तिचे शेंगात रूपांतर झालेले नाही. जे पीक ९० दिवसीय झाले ते आता पिवळे पडण्यास सुरुवात झाली आहे. तर हळूहळू पिके सुकून जात आहेत.

पाहणी करण्यासाठी अधिकारी फिरकले देखील नाही

सोयाबीन लागवड करतांना २२० रुपये प्रति एकर प्रमाणे शुल्क आकारून मार्गदर्शन देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आलेला नाही. सोयाबीन लागवड करतांना जमिनीची मशागत, बियाणे, खते, पाणीपट्टी, औषध फवारणी, मजुरी, टोकणी असा एकंदरीत २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे.

सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

कंपनीने सदोष बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत आणि योग्य अशी भरपाई मिळवून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हा कृषी अधिकारी, महाबीज प्रक्रिया केंद्र, ग्राहक पंचायतकडे लेखी तक्रार केली आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

किमान उत्पादन खर्च निघणे अशक्य

कंपनीने प्रति हेक्टर २५ ते ३० क्विंटल उत्पादनाचा दावा केला होता. मात्र सोयाबीनला मुबलक प्रमाणात फुलकळ्यांचा बहर आलेला नाही. फुलकळ्या येऊन देखील शेंगा लागलेल्या नाही. उलट पीक पिवळे पासून सुकून जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे देखील अशक्य आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *