इतर बातम्याबाजार भाव

उन्हाळी सोयाबीन प्रयोग फसला? शेतकऱ्यांच्या चिंतेत भर…

Shares

यंदा उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. हंगाम नसतांना देखील घेतलेले सोयाबीनचे पीक तसेच त्यामुळे अतिरिक्त जास्त प्रमाणात खतांची मात्रा यामुळे अजूनही फूलकळी आलेली नाही. काही ठिकाणी फूलकळीचे प्रमाण ३० % ते ४० % पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे मुश्किलीचे झाले आहे.

सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ७ ते ८ हजारांच्या घरात गेल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. १०० दिवसांच्या वाणाला ४५ दिवसानंतर तर १२० ते १४० दिवसांच्या वाणाला ७० ते ८० दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही सोयाबीनला म्हणावी अशी फूलकळी आलेली नाही.

सोयाबीनचे दर पुन्हा ७ हजारानावर स्थिर

मागील आठवडाभरापासून बाजारपेठेत सोयाबीनचे भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बाजारपेठेतील सोयाबीनची आवक कमी झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. मात्र दरवाढीच्या आशेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले होते. पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीनने आठ हजारांचा टप्पा ओलांडला होता.
पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण होऊन सोयाबीनचे दर प्रति क्विटल ७ हजार झाले आहे.

हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा भरगोस उत्पन्न, आंतरपिकासाठी उत्तम पर्याय

काय आहे शेतकऱ्यांची मनःस्थिती ?

काही ठिकाणी फूलकळीचे प्रमाण ३० % ते ४० % पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता उभ्या सोयाबीनच्या पिकात ट्रॅक्टर घालण्याच्या मनःस्थितीत आहेत. तर काही शेतकरी सोयाबीनचे ढाळे कापून जनावरांना खाद्य म्हणून देत आहेत.

हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यासाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. मात्र, उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामुळे शेतकरी आणखी आतबट्ट्यात येणार आहे. आता तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

पाहिजे तशी फुले येत नाहीये..

सध्या ४४९ हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. असे असले तरी आठही तालुक्यात या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फुले येत नसल्याची तक्रार सध्या शेतकरी करीत आहेत.

२०२१ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यात १७ हजार ८६० शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ५२८ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. यंदा किमान ९०९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड होण्याची अपेक्षा कृषी विभागाला होती. प्रत्यक्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४४९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *